पान:वनस्पतिविचार.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

मिळतो, तसेच, पुंतत्त्वबिंदूचा दुसरा भाग मध्यभागी असणाऱ्या द्वितीय केंद्राशीं (Secondary nucleus ) मिळून त्याचे कसे पोषक केंद्र उत्पन्न होते, वगैरे गोष्टी आम्हीं वर्णन केलेल्या आहेत. शिवाय गर्भधारणा झाल्यावर पाकळ्या, पुंकेसर दलें, वगैरे आपोआप वाळून गळू लागतात, व गर्भ जोराने वाढू लागतो. बीजदलें ( Cotyledons ) गर्भासंभोवती असणाऱ्या अन्नाचे शोषण करू लागतात. जेथे पूर्ण शोषण होते, तेथे गर्भासभोवती अन्नाचे आवरण रहात नाही. पोषक अन्ने दलांस सांठविल्यामुळे दले मोठी होतात, अगर मांसल बनतात. जेथे पूर्ण शोषण होत नाही, तेथे दलें लहान व पातळ राहतात. अन्नाचे आवरण गर्भाच बाह्यांगी राहते; ही गोष्ट खरी की, अन्न शोषण होणे जरूर आहे. मग ते शोषण गर्भ वाढून बीजदले पक्व होत असतांना होवो, अथवा बीजें जनन होत असतां दलांकडून मगज वेष्टणांतील अन्नाचे शोषण मागाहून होवो. ह्या अन्नाचा उपयोग बीजास जनन ( Germination ) होण्याचे वेळी व्हावा अशी नैसर्गिक तरतूद असते, पण उपयोग होण्यास त्या अन्नाचे अंतरशोषण होणे अशक्य असते. ही तरतूद नसती तर बीज रुजून वाढले नसते.

---------------
प्रकरण २१ वें.
---------------
उपपुष्पपत्रें ( Bracts ) व मोहोर, ( Inflorescence ).
---------------

 उपपुष्पपत्र ( Bract )-=ज्या पानासारख्या भागांतनु फुलांची दांडी उगवते, त्या भागास उपपुष्पपत्र ( Bract ) म्हणतात. ही उपपुष्पपत्रें पुष्कळ फुलात वेगवेगळ्या तऱ्हेची व वेगवेगळ्या रंगाची असतात, कधी ती अगदी साध्या पानासारखी असतात. जसे, विष्णूनीळ. मात्र त्यांचा आकार पानापेक्षा लहान असतो. मक्याचे कणसावरील आवरणे उपपुष्पपत्रे आहेत, केवड्याचे कणसांतील सुवासिक पिवळी लहान आवरणे सुद्धा उपपुष्पपत्रेच होत. असली आवरणे एक झाल्यावर एक येऊन नंतर अंतर्भागी लहान लहान फुले लोंबत्या दांडीवर येतात. केळीमध्ये प्रत्येक फणावर एक एक तांबडी संरक्षक पारी असते. ही पारी केळ्यांतील उपपुष्पपत्र होय. घुंंया,