पान:वनस्पतिविचार.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

नाहीं. पण अलीकडील शोधांती असे ठरत आहे की, अग्ररंध्रच परागकणाच्या आंत शिरण्याचा रस्ता, असे नसून इतर भागांतूनही परागकण शिरू शकतो. रंध्रांतून परागकण शिरला म्हणजे त्यास वरून खाली यावे लागते; पण रंध्रांतून न शिरतां तो बीजाण्डाचे बुडाकडून शिरतो, तेव्हां प्रथम तो खाली येऊन नंतर पुनः वर जातो, एवढाच काय तो फरक.

 बहुदलधान्य-वनस्पतीत बीजाण्डांची गर्भधारणा मुख्य बाबतीत वरीलप्रमाणे असते. बहुदलधान्य-वनस्पतींत अण्डाशय पूर्ण झांकलेला नसून बीजाण्डे दलावर उघडी असतात. पुंकेसरापासून परागकण गळू लागले असतां, परागवाहिनी नसल्यामुळे ते परागकण पुष्कळ वाया जाण्याचा संभव आहे. बीजाण्डे दलावर उघडी असल्यामुळे त्यावरील रंध्र परागकण पकडण्यास उपयोगी पडते. परागकण वाऱ्याने रंध्रापाशी नेले जातात. रंध्रावर डिंकासारखा एक बिंदु असतो. त्यामुळे परागकण तेथे चिकटून राहतात. जेव्हा तो चिकट बिंदु वाळू लागतो, तेव्हां परागकणही रंध्रामध्ये संकुचित होतात. रंध्रात शिरल्यावर परागकणांच्या लांब नळया बनतात. परागकण गळण्याचे दिवसांत हे रंध्र मोठे व रुंद होऊन रंध्रावर डिंकाचे बिंदु चमकत असतात. पुष्कळ वेळां हें बिंदु दंवाचे बिंदु असावेत, असा समज होण्याची संभव आहे, पण हे दंवाचे बिंदु नसून परागकण पकडण्याकरिता ही नैसर्गिक व्यवस्था असते. ह्या व्यवस्थेशिवाय परागकण सहसा पकडले जाणार नाहींत व पुढील बीजही त्यापासून तयार होणे शक्य नसते. तो बिंदू गळू लागला म्हणजे परागकण रंध्रांत अडकला जाऊन पुनः बाहेर जाईल अशी भीति नसते. परागकण रंध्रांत सांपडला म्हणजे लागलीच गर्भधारणेस सुरवात होते, असे नाहीं. कित्येक वेळां ते परागकण सहा सहा महिने आंत राहू शकतात, तोपावेतों बीजाण्डांतही फरक होत असून आंतील गर्भाण्ड पक्वदशेत येत असते, पक्वदशा आल्यावर गर्भधारणेस उशीर लागत नाही. रंध्रांत सांपडल्यावर परागकणाचे वेगवेगळे विभाग होतात. पैकीं कांहीं विभाग लहान व कांहीं मोठे असतात. लहान भागांपैकी एक भाग पुंतत्वजननपेशी असतो. मोठ्या भागापासून परागनळी उत्पन्न होऊन त्यांतून जननपेशी जातांना तिचे दोन भाग होऊन एकच भाग गर्भधारणक्रिया उरकतो. ज्युनिअरमध्ये ते द्विधा होणारे दोन्ही भाग गर्भधारणेस उपयोगी पडतात. एवढेच नव्हे तर जास्त जरूरी असेल तर