पान:वनस्पतिविचार.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
प्रकरण १९ वें.
---------------
पुंकोश व स्त्रीकोश.
---------------

 पुंकोश Androecium:हें वर्तुळ पूर्ण फुलांत पाकळ्यानंतर स्त्रीकोशापूर्वी येते. केवळ स्त्रीकेसर फुलांत ह्या वर्तुळाचा अभाव असतो. पुंकेसर फुलांत तीन भाग विशिष्ट प्रकारचे असतात. पहिला भाग केसर ( Filament ) दुसरा भाग, पराग पिटिका (Anther) व तिसरा पिटिकेंतील परागकण. हे तिन्ही मिळून एक पुंकेसर बनतो. कधी कधी केसर असत नाहीं. जसे वांगें, बटाटे वगैरे. जसे पानास पत्र असते तसे पुंकेसरदलास पराग पिटिका असते. पराग पिटिकेचे रंगही पुष्कळ प्रकारचे आडळतात, विशेषेकरून पांढरा रंग पुष्कळ फुलांत असतो. जसे कण्हेर, जाई, धोत्रा, वगैरे.

 केसर filament—हा निरनिराळ्या आकाराचा असतो. गहू, बाजरी, जव वगैरेच्या फुलांमध्ये तो नाजूक व अगदीं तंतुसारखा असतो. कर्दळ, लिली, घायपत, वगैरे फुलांत तो जाड असतो. कधी कधी त्यांवर उपांगे असतात. जसे भोंकर. कांद्याच्या फुलांत त्याच्या उपांगास दातासारखा आकार येतो. रुई, मांदार, हरिणखुरी वगैरेच्या फुलांमध्ये उपांगें शृंंगासारखी असतात. काही ठिकाणी परागपिटिका मुळीच नसून केसर जाड होतात. अशावेळी त्यास लहान पाकळ्या सारखा आकार येतो. गुलाब, कर्दळ वगैरेच्या फुलांत अशा प्रकारची स्थिति आढळते. त्यांची लांबी, जाडी, रुंदी, तसेच वेगवेगळे रंग, वाढण्याची दिशा, हीं निरनिराळ्या फुलांत वेगवेगळ्या तऱ्हेची असतात. गुलछबु, धोत्रा, वगैरे फुलांत तो लांब असतो. तसेच तृण जातींत फुलांच्या आकारमानानें ते लांब असतात. वांगी, बटाटे, भोकर, वगैरेमध्ये ते अगदी लहान असतात, अथवा मुळीच नसतात, असे म्हटले असतां चालेल. बहुतेक त्याची दिशा सरळ, आत वळलेली अथवा लोंबती असते. ह्यासही अपवाद पुष्कळ असतात. पानशेटिया फुलांत केसरास एक जोड असून त्यावर परागपिटिका असते. खरोखर तो व त्यावरील पिटिका, मिळून एक अपूर्ण स्वतंत्र केवल-