पान:वनस्पतिविचार.pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१५४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

तीन दले दुसऱ्या वर्तुळापैकी असतात. अशा सादृश दलवर्तुळास पुष्पपरिकोश (Perianth ) असं साधारण नांव दिले जाते, व नेहमी याच नांवाने त्या दोन्ही वर्तुळास संबोधितात. जेव्हां फुलांत पुष्पकोशाचा अथवा पुष्पमुगुटाचा अभाव असतो, अशावेळी ह्याच नांवाचा उपयोग उरलेले एकटें बाह्यवर्तुळ संबोधण्यास करितात. जसे, एरंडी वगैरे. एरंडीमध्ये पुष्पमुगुटाचा अभाव असून केवळ बाह्यभागी पुष्पकोश आढळतो. ह्या पुष्पकोशास पुष्पवपरिकोश (Perianth) म्हणतात. त्याचप्रमाणे गुलबक्षीच्या फुलांत पुष्पकोशाचा अभाव असतो, पण केवळ पांकळ्यांचे वर्तुळ असते. ह्यासही वरीलप्रमाणे पुष्पपरिकोश Perianth असे संबोधण्याची वहिवाट आहे.

 सांकळ्या कधी सुट्या तर कधी संयुक्त असतात. मोहोरी,शिरस,मुळे वगैरेंच्या कुलांत ह्या सुट्या असून, कापूस, जास्वंद, तंबाखू, वांगी वगैरे फुलांतही संयुक्त असतात. गुलाबाचे फुलांतही दलें अगदी पानासारखी असतात- सांकब्यास पानांप्रमाणे मात्र कोठेही देंठ असत नाही. दलें सारख्या आकाराची असतां त्यास व्यवस्थित Regular म्हणतात. जसे रानजाई, व ह्याचे उलट अव्यवस्थित Irregular म्हणतात. जसे बाहवा, तरवड, संकासूर वगैरे.

 जेव्हां सांकळया सुट्या असतात,त्यावेळेस त्या किती आहेत, हे सहज मोजितां येते, पण जेव्हां त्या संयुक्त असतात त्यावेळेस पूर्णपणे त्यांची संख्या ओळखण्यास संयोगावर अवलंबून असते. काहींमध्ये संयोग बुडाशी असून टोंकाकडे दले सुटी असतात. अथवा संयोग मध्यभागापर्यंत असून अग्रांकडील भाग मोकळा राहतो. पण जेव्हां संयोग पूर्ण होऊत दलांचा जणू एक प्याला अथवा नळी बनते, तेव्हां मात्र त्यांची संख्या ओळखणे कठीण होते. त्यावर किती मध्यशिरा आहेत, हे नीट पाहून त्यांची संख्या सहज सांगता येणार आहे. कारण प्रत्येक दलास मध्यशीर असते म्हणून मध्यशिरेच्या संख्येप्रमाणे ती दले आहेत असे अनुमान काढणे चुकीचे होणार नाहीं.

 संयोग कधीं सारखा असतो; अगर वांकडा तिकडा अव्यवस्थित असतो. व्यवस्थित अगर अव्यवस्थित संयोगाप्रमाणे वर्तुळास वेगवेगळे आकार येतात. कोनाकृति, ओष्ठाकृति, घटाकृति वगैरे आकार नेहमी आढळतात. ह्याचप्रकारचे