पान:वनस्पतिविचार.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 फुलांत पुंकोश व स्त्रीकोश एके ठिकाणी असल्यामुळे परस्पर स्त्री-पुरुषसंयोगास सुलभ पडते. प्राणीवर्गात एकाच जागीं स्त्री व पुरुष व्यंजक अवयव नसतात. दानव्या सारख्या क्षुद्र प्राण्यांत दोन्ही स्त्री व पुरुषव्यंजक अवयव एकाच जीवाच्या शरीरावर आढळतात. पण स्त्रीव्यंजक अवयवास गर्भधारणा साधण्यास त्याच शरीरांवरील पुरुषव्यंजक अवयव उपयोगी पडत नाहीत. दोन दानवें परस्पर एकमेकांस चिकटून परस्पर फायदा करून घेतात. दोन्हीमध्ये गर्भधारणा होऊन दोन्हीपासून पुढे प्रजोत्पत्ती होते. केवल स्त्रीकेसर फुले दुसऱ्या केवल-पुंकेसर फुलांतील परागकणांमुळे गर्भीकृत होतात. परागकण स्त्रीकेसर फुलास पोहोचविण्याची वेगवेगळी नैसर्गिक योजना असते.

 पानांची मांडणी फांदीवर कांही विशिष्ट प्रकारची असते. तद्वतच फुलाच्या वर्तुळदलांत कांहीं विशिष्ट रचना आढळते. ‘एक झाल्यावर एक' (Alternate) २, समोरासमोर. (Opposite ) ३, वर्तुळाकृति ( Whorled ) ह्या तीन रचना पानांत असतात. फुलांतील वर्तुळ दलें बहुतकरून पुष्पदंडावर वर्तुळाकृतींत येतात. जसे खोडावरील अथवा फांदीवरील अंतरकांडी संकुचित होऊन परस्पर संलग्न होतात, व त्या संलग्न जागेपासून पानांचा झुपका येत असतो, त्याचप्रमाणे पुष्पदंडावरील अंतर कांडी संकुचित होऊन ती चारी वर्तुळे जणू एका जागेपासून निघाली आहेत असे वाटते.

 एखादे वेळेस पहिल्या अगर दुसऱ्या वर्तुळांत दलांची वाढ अधिक होऊन त्यास चमत्कारिक स्वरूप येते. तेरड्याचे फुलांत पुष्पकोशामध्ये एक उलटी सांकळीवर ( Sepal ) चिकटली असते. नॅस्टिरशियम फुलामध्ये तेरड्याप्रमाणे एक पाकळी दुसऱ्या पाकळीवर उलटी आली असते. आगस्त्याचे फुलांत पांच पांकळ्या असून एका पाकळीची वाढ जास्त होऊन जिभेसारखी ती लोंबत राहते, दोन पांकळ्या पक्ष्याच्या पंखाप्रमाणे दिसतात, व उरलेल्या दोन्हीस बोटीसारखा आकार येतो. कित्येक फुलांची वर्तुळे द्विगुणित झाली असतात, अथवा नुसती वर्तुळे द्विगुणित न होतां वर्तुळांची दलें द्विगुणित होतात. अफूच्या फुलांत पुंकेसर वर्तुळ द्विगुणित असते. बारबरी नांवाच्या वनस्पतीची फुलं ह्याच प्रकारची असतात. पहिली तीन वर्तुळे द्विगुणित होतात. फुलांत पांकळ्या द्विगुणित अथवा बहुगुणित असतात. विशेषेकरून