पान:वनस्पतिविचार.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

वनस्पतीमधील जीवनकणांच्या सतेजपणांवर व आरोग्यावर असले चमत्कार अवलंबून असतात. कारण उत्तेजन ग्रहण करणे किंवा प्रत्युत्तर देणे ह्यासंबंधी शक्ति वरील गोष्टींवर अवलंबून असते. निरोगी व सशक्त जीवनकण उत्तेजनास प्रत्युत्तर नेहमी देतात. निरोगी स्थितीत त्यांची शक्ति प्रत्युत्तर देण्यासारखी असते. जमिनीत पाणी नसल्यामुळे वनस्पतिपोषक पदार्थ पुरेसे मिळत नाहीत, अथवा फाजील थंडी असली तर त्यामुळे ते कण निर्जीव होऊन उत्तेजन व प्रत्युत्तर चमत्कार बंद होतात.

 पाने जी वळतात त्यांचा उद्देश कधी कधी नाजुक पृष्ठभागाचे संरक्षण करण्याविषयी असतो. वळत राहिल्याने सुर्यकिरणापासून फारसा त्रास पहचत नाहीं. विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, संयुक्त पानांत पत्रें एकमेकांवर पडून आपापल्या नाजुक वरील पृष्ठभागाचे रक्षण करतात. कांहीं वनस्पतींमध्ये तर पानांची गुंडाळी होऊन पोटाकडील भाग पूर्ण झांकिला जातो.

 कुंड्या खिडकीत ठेविल्या असतां त्यांतील रोपे बाजूकडील येणाऱ्या प्रकाशाकडे वळलेली असतात. त्याचप्रमाणे अंधाऱ्या कोठडीत बीजें उगविण्याची व्यवस्था करावी. कोठडीत एका दिशेकडून प्रकाश येईल अशी तजवीज असावी. बीजापासुन उगवतीं रोपडी प्रकाश येणाऱ्या दिशेकडे जणुं लांब माना करून वळलेली असतात. ह्यांचे कारण खोडावर किंवा वाढत्या कोंबावर सूर्यप्रकाशाच्या उत्तेजक आकर्षणशक्तीचा परिणाम होतो. प्रकाशाकडे वाढती अग्रे वळणे म्हणजे प्रकाशाचे उत्तेजनास प्रत्युत्तर देणे होय. खोडावर प्रकाशाचा जो परिणाम दिसतो. त्याचे उलट परिणाम मुळ्यांवर होत असतो. ह्यामुळे मुळ्या प्रकाशाकडे न वळतां उलटपक्षी जमिनीत शिरून सूर्यप्रकाश टाळतात. म्हणजे प्रकाशाचे सर्व अवयवांवर सारखे उत्तेजन असते असे नाही, शिवाय प्रत्युत्तरही वेगळे असते.

 बिग्नोनियांची सूत्रे ( Tendrils ) याचप्रमाणे सूर्य प्रकाश टाळून अंधाराकडे वळतात, त्यामुळे ती भिंतींत शिरून बिग्नोनियाचे वेलास आधार मिळतो. प्रकाशापासून पानासही एक प्रकारचे उत्तेजन मिळते की, ज्या योगाने पानांतील हरिद्वर्ण सेंद्रिय पदार्थ बनविण्याचे काम व्यवस्थितपणे करितो. तसेच सूर्यकिरणें सारखी न पडू देतां जरूर तेवढा प्रकाश घेण्याची व्यवस्था पानें मागें पुढे वळून करून घेतात. प्रकाश सारखा पुष्कळ असेल तर तत्संबंधी चमत्कार