पान:वनस्पतिविचार.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

गेले म्हणजे पुढे नवीन तसले पदार्थ न मिळाले तर ती श्वासोच्छ्वासक्रिया बंद होणारच. पूर्ण वाढत्या स्थितीपेक्षां कोवळ्या स्थितीत आपल्या मानाने श्वासोच्छ्वासक्रिया अधिक जोराने चालते. बीजजनन होत असतां प्रथम ही क्रिया मंद असून पुढे जेव्हां बीजाचे अंकुर दीर्घ होतात, त्यावेळेस ही क्रिया जोराने चालू होते; पण पाने वाढून स्वतंत्र रितीने अन्नशोषणक्रिया सुरू झाली म्हणजे त्यामधील श्वासोच्छ्वासक्रिया पूर्वीपेक्षा मंद चालते. हिंवाळ्यात झाडे निद्रितावस्थेत असतांना श्वासोच्छ्वास क्रिया मंद चालते व असे चालणे जरूरीचे असते. कारण निद्रावस्थेत नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होत नाहींत व जर श्वासोच्छ्वास क्रिया नेहमीप्रमाणे जोराची सुरू असली तर ते सेंद्रिय पदार्थ लवकर संपून पुढे पंचाईत पडली असती. पण उन्हाळ्यांत श्वासोच्छ्वास क्रिया जोराने चालू होते. उष्णतेचा परिणाम ह्या क्रियेवर नेहमी होत असत. उष्णता अधिक तर श्वासोच्छ्वास क्रियेचा जोर अधिक असतो. बीजे जिवंत असून, निद्रितावस्थेत असल्यामुळे त्यामध्ये श्वासोच्छवासक्रिया चालत नाहीं. बीजे पुष्कळ दिवस टिकतात. ह्याचे कारण त्यामध्ये श्वासोच्छ्वासक्रिया न चालणे होय. बटाट्याच्या कोठाऱ्यास सर्द हवा लागली तर बटाटे श्वासोच्छ्वासक्रिया सुरू करितात व त्यापासून अंकुर फुटू लागले म्हणजे बटाटे फार दिवस टिकत नाहींत. श्वासोच्छ्वास क्रियेमुळे आंतील सेंद्रिय अन्न दिवसेंदिवस कमी होऊन बटाटे कुजू लागतात. ह्याकरितां वरचेवर बटाटे चाळवून सडलेले बटाटे बाहेर काढीत असावे. बीजांस सुद्धा सर्द हवा लागून उपयोगी नाही. नाही तर श्वासोच्छ्वास क्रिया सुरू होऊन बीजें उगवू लागतील. बीजे ठेवण्याची जागा चांगली कोरडी असली पाहिजे. पाण्याचा अंश श्वासोच्छ्वास क्रियेस उत्तेजित करून बीजापासून अंकुर फुटतात. बीजांतील निरनिराळ्या द्रव्याप्रमाणे श्वासोच्छ्वास क्रिया कमी अधिक चालते. तेलट बीजें हवेतून ऑक्सिजन वायु जास्त शोषण करतात. सात्विक बीजे हा वायु कमी घेतात. ज्यामध्ये नायट्रोजनयुक्त पौष्टिक द्रव्ये असतात, अशी बीजे जास्त श्वासोच्छ्वास करितात.

 पाण वनस्पति पाण्यांतून आक्सिजन वायु शोषण करून श्वासोच्छ्वास क्रिया चालवितात. अति खोल पाण्यांत आक्सिजन वायु मिळणे अशक्य असेल अशा ठिकाणी वनस्पति उत्पन्नही होणार नाहीत. पुष्कळ वेळा पाण-