पान:वनस्पतिविचार.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

पानाचा आकार लहान होतो. कधी कधी पानांवर मेणाचे सारवण होऊन फाजील बाष्पीभवनापासून संरक्षण केले जाते. कित्येकवेळां पाने, तसेच हिरवा खोड ही दोन्हीं केसांच्या वेष्टणाखाली झांकून जातात. केंसांचे योगाने सूर्याचा ताप व उष्णता ह्यांपासून संरक्षण होऊन बाष्पीभवन आपोआप कमी होते. जेथे सूर्याचा ताप व उष्णता अधिक, तेथे बाष्पीभवनही अधिक असते; पण बाष्पीभवन वनस्पतीच्या पाण्याच्या सांठ्यावर अवलंबून असते; म्हणून जेव्हा अधिक बाष्पीभवनाची जरूरी असते, त्यावेळेस ते अधिक होण्याची साधने उत्पन्न होतात. तसेच जेव्हां त्याची फारशी जरूरी नसून कमी व्हावे असे वनस्पतीस वाटू लागते, त्यावेळेस ते कमी करण्याची तजवीज होऊ लागते. वनस्पतीमधील सजीव तत्त्व ह्या सर्व गोष्टींची अम्मलबजावणी करीत असते. म्हणूनच निजींव पदाथांमधून होणारे बाष्पीभवन व सजीव वनस्पतीपासुन होणारे बाष्पीभवन ह्या दोहोंत महदंतर असते. हे अंतर असणे अत्यंत जरूरीचे आहे. नाहीतर वनस्पतीच्या आयुष्यक्रमावर ह्याचा वाईट परिणाम तत्काल घडून आला असता.

 झाडांवर कळ्या येणे व उमलणे तसेच पाने कमी अधिक वाढणे, ह्या गोष्टी सुद्धा वनस्पतीच्या बाष्पीभवनावर अवलंबून असतात. पाने खोडापासून गळणे हे सुद्धा अप्रत्यक्षरीतीने वनस्पतीच्या बाष्पीभवनावरच अवलंबून असते. पाने नेहमी केव्हांना केव्हां फिक्की पडून गळून जातात. त्या वेळेस त्यांच्या चलनक्रिया थोड्याशा कमी होतात. काही ठिकाणी साधारण नियम असा आहे की, नवीन पाने येऊ लागली असती जुनी पाने गळून जातात. पण ज्या प्रदेशांत हवेचे फेरबदल नेहमी होतात, त्या ठिकाणी वर्षाचे एका ऋतूत झाडांची सर्व पाने गळून जातात व कित्येक दिवसपर्यंत पानांशिवाय नुसत्या फांद्या राहतात. अशा फांद्या जणू निर्जीव आहेत असे वाटते. ज्या प्रदेशांत पावसाळा थोडा असून कोरडा उन्हाळा पुष्कळ दिवस टिकतो, त्याच प्रमाणे जेथे कडक हिवाळा असून वरचेवर बर्फ पडू लागते, अशा प्रदेशांत झाडांची पाने गळून ओसाड प्रदेश दिसू लागतो. तसेच उन्हाळा व पावसाळा ह्या दोन्हींमध्ये फारसा फरक नसून, पाऊस प्रत्येक महिन्यांत पडत असतो, अशा ठिकाणी हिवाळा सुरु होतांच पाने गळून जातात, व तो संपल्यावर