पान:वनस्पतिविचार.pdf/122

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

स्थिति पेशींत येते. पण पूर्वीप्रमाणेच त्याही पाण्याचा उच्छ्वास काष्ठवाहिन्यांत होऊन सारखा पाण्याचा प्रवाह वर जाऊ लागतो. खरोखर केसाच्या पेशी तसेच सालींच्या प्रदेशांतील ( Cortex) पेशी पंपाप्रमाणे पाणी काष्ठवाहिन्यांत खेचून वर चढवीत असतात. पाणी खेचण्यास उपयोगी पडणारी शक्ति ही खरोखर मुळांतील पेशीच्या तणाण्यामुळे उत्पन्न झाली असते. ही शक्ति म्हणजे पेशीच्या तणाणण्यास मिळालेले एक प्रकारचे प्रत्युत्तर होय. ह्याच शक्तीमुळे वनस्पतिशरीरांत पाणी सारखें वर चढत असते, अशा शक्तीस मूलजनितशक्ति ( Root Pressure ) म्हणतात.

 ही शक्ति केवळ पाण्याच्या जोराने उत्तेजित असते, असे म्हणता येणार नाही. ही उत्पन्न करण्यांत सजीवतत्त्वाचेही सहाय्य असते. तिला व्यवस्थित स्वरूप आणून ती सारखी चालू राखणे हे सजीवतत्त्वामुळेच होते. कारण जेव्हां पाणी ऑसमॉसिस क्रियेने सालीच्या प्रदेशांत शिरते, त्यावेळेस पेशीतील सजीवतत्त्व उत्तेजित होऊन त्या फाजील शिरणाच्या पाण्यास आपल्या कणांतून पुढे जाण्यास जागा देते. सजीवतत्त्व संकुचित न होतां पाण्याबरोबर आपण आपलं घनत्व कमी करून पाण्यास दुसरे पेशींत जाण्यास सुलभ करते. जर पाणी शिरले असतां सजीवतत्त्व पातळ न होता तसेच राहते, तर पाण्यास पुढे जाण्यास जरा अडचण पडती. पण तसे न होतां व्यवस्थितपणे पाणी बाहेर दुसरे पेशींत जाण्याची तजवीज सजीवतत्व पातळ होण्याने होते. काष्ठग्रंथीतील वाहिन्यांत सजीवत्त्वाचा अभाव असल्यामुळे त्यात सारखे पंपाप्रमाणे पाणी ओतण्याची व्यवस्था झाली म्हणजे बस्स असते. सारखे पाणी ढकलल्यामुळे पहिले पाणी वर वर चढत जाते. शिवाय हे पाणी पानांत पोहोंचल्यावर शिरांतून बाहेर हरित् पेशींत जातांना पूर्वीप्रमाणे पुनः ऑसमॉसिस क्रिया सुरु होते. ह्या पेशींतील जीवनकणाचे घटक अधिक शोषक असल्यामुळे शिराच्या सर्द भित्तिकेपासून भराभर पाणी ओढून घेतात. रात्रीच्या वेळी बाष्पीभवन बंद असल्यामुळे ऑसमॉसिस् क्रिया व त्यामुळे मुळ्यांत पेशी तणाणण्यापासून उत्पन्न होणारा पाण्याचा जोर ही दोन्ही चांगली दृष्टीस पडतात. अंतर प्रदेश पाण्याने तणाणण्यामुळे वाहिन्यांतून पाणी वर पानापर्यंत चढत जातें. दिवसा उजडी पानांतील पाण्याचा उपसा होत असल्यामुळे ही क्रिया स्पष्ट दिसत नाही. रात्री पाण्यास बाहेर जाण्यास मार्ग नसल्यामुळे पानाच्या