पान:वनस्पतिविचार.pdf/119

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


११वे ].  ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).  ९१
-----
प्रकरण ११ वें.
---------------
ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure).
---------------

 शोषणक्रियाः–प्रथम मुळ्या जमिनींतून अन्न कसे जमा करितात व पुढे ते कसे खोडांत पोहोचविले जाते, ह्याचा विचार करू.

 मुळे जमिनीत घुसल्यावर त्यांस निरनिराळ्या फांद्या येऊन, अग्राजवळ प्रत्येक फांदीवर अथवा आदिमूळावर बारीक बारीक एकपेशीमय केंस येतात, हें केंस अन्न शोषून घेण्याचे कामांत वनस्पतींस उपयोगी पडतात. सजीव तत्त्व, केंद्र व इतर पेशीद्रव्ये ह्या केसांच्या पेशींत नेहमी आढळतात. जेव्हा यांचा मातीशी संबंध येतो, त्या वेळेस दोहोंमध्ये ऑसमॉसिस क्रिया अथवा शोषणक्रिया सुरू होते. जमिनीत पाणी असून त्यामध्यें निरिंद्रिय द्रव्ये विरघळतात. केसांतील जीवन कणांची शोषकक्रिया जास्त असल्यामुळे बाहेरील द्रव्यमिश्रित पाणी पेशीभित्तिकेमधून आत शिरते. पाणी शिरल्या नंतर जीवनकण पातळ होऊ लागतात, पण पुढे लवकरच ह्या द्रव्याकरिता वेगळीं जडस्थाने उत्पन्न होऊन त्यांत ती सांठविली जातात. जीवनकण भित्तिकेजवळ राहिल्याने एकदां शोषण केलेली द्रव्ये बाहेर जाऊ शकत नाहीत. शुद्ध पाणी वाटल्यास बाहेर जाते. शुद्ध पाण्यास अटकाव नसतो. केसांत एक प्रकारचे आम्ल असून ते ऑसमासिस क्रिया सुरू झाल्यावर थोडे बाहेर येते व जमिनीतील पाण्याशीं मिसळते. बाहेर आलेल्या आम्लाचा उपयोग सुद्धा वनस्पति चरित्रांत होत असतो. कारण जमिनीत साध्या पाण्यात न विरघळणारी पुष्कळ द्रव्ये असून, विरघळल्याशिवाय पेशीभित्तिकेंत ती शिरणे फार कठीण असते; म्हणून वनस्पति कांहीं तजवीज न करील तर त्यांचा पोषणास उपयोगही होणार नाही. मग अशी द्रव्यें जमिनीत असून नसून वनस्पतीस काय उपयोग? पण ईश्वरी नियम असा आहे की, ही द्रव्ये वायां न जाऊ देतां वनस्पतीस उपयोगी पडावीत म्हणून त्याकरितां तजवीजसुद्ध केली असते. असल्याने विरघळणाऱ्या द्रव्यास विरघळून सोडणे हा त्या बाहेर येणाऱ्या आम्लाचा उपयोग असतो. खरोखर हा उपयोग मोठा महत्त्वाचा