पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



ग्रंथसंपादक व प्रसारक मंडळीचा
किताबखाना
ठाकुरद्वाररोड-मुंबई.

 या किताबखान्यांत श्रीमंत गायकवाड सरकार, डेक्कन व्हरनाक्यूलर ट्रान्सलेशन सोसायटी, सत्कार्योत्तेजक समाज धुळे, मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी, विविधकला ग्रंथप्रसारक मंडळी, निर्णयसागर छापखाना, चित्रशाळा प्रेस, न्यु किताबखाना, गोंधळेकर, पोतदार, बाबाजी सखाराम आणि कंपनी, पाठक ब्रदर्स, गुर्जर, ढवळे, पुरंदरे, हिंद एजन्सी, इत्यादि वेगवेगळ्या संस्थांनी आणि प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले सर्व प्रकारचे मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत ग्रंथ, व लहान मोठी सर्व विषयांवरील पुस्तके, वाजवी भावाने विकत मिळतात.

शालोपयोगी सर्व प्रकारची पुस्तकें व सामान

याचा संग्रह केलेला असून, शाळाखात्यात मराठी पहिले इयत्तेपासून ते सातवे इयत्तेपर्यंत आणि इंग्रजी मॅॅट्रीकपर्यंत लागणारी सर्व पुस्तके, व ड्रॉइंग वगैरेचे सामान, देशी कागदावरील एक्झरसाईज व कॉपीबुके वगैरे वगैरे माफक भावाने मिळतें. शाळामास्तर, लायब्ररी व घाऊक खरेदी करणारे व्यापारी, यांस योग्य व भरपूर कमिशन दिले जाते. आमच्या किताबखान्यांत हल्ली विक्रीस तयार असलेल्या यादी सागवावी, फुकट पाठवू. नाटपेड पत्रे घेतली जात नाही. खुलासा पाहिजे असल्यास उत्तराकरितां टिकीट पाठवावे. सर्व पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा :-

दामोदर सावळाराम आणि मंडळी,
प्रिंटर्स, पब्लिशर्स आणि एजंटस् ठाकुरद्वार, मुंबई.