पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




याच ग्रंथकाराने तयार केलेले ग्रंथ.
दोन हजार वर्षांची सुलभ जंत्री.

 या जंत्रीच्या सहाय्याने इ० सनाचे आरंभापासुन दोन हजार वर्षांपैकी कोणत्याही सालांतील तारखेवरून वार व शालिवाहन, हिजरी, फसली किंवा आर्बी या सालांतील तिथी अगर तारीख अगदी थोडक्या वेळांत थोडक्याशा गणिताने काढता येते. तसेच शालिवाहन शकांतील मिति आणि आर्बी फसली वगैरे सनांतील तारीख यावरून इसवी सन, महिना, तारीख व वार काढता घेतो. अशा तऱ्हेचे पुस्तक मराठीत हें पहिलेच आहे. ऐतिहासिक गोष्टींचा काल निश्चित करण्याचे कामी या जंत्रीचा विशेष उपयोग होणार असून दिवाणी व मुलकी कामदार, वकील लोक, शाळामास्तर, यासही तारखांचा निर्णय करण्याचे कामी तिचा उपयोग होणार आहे. जंत्रीचा फायदा सर्वांना घेता यावा म्हणून किंमत अगदीच थोडी म्हणजे फक्त आठ आणे ठेवणार असून आगष्ट १९१३ अखेरपर्यंत आगाऊ नांवे नोंदविणारांस तर सदर्हू जंत्री पाऊणपट किंमतीस देण्याची विशेष सवलत ठेविली आहे; तरी ग्राहकांनी आगाऊ नांवे नोंदविण्याची त्वरा करावी.

--------------------
व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन
पुस्तक २ रें.

 सुलभ-औद्योगिक-ग्रंथमालेपैकी हे दुसरे पुस्तकही लिहून तयार आहे. आगाऊ पांचशें वर्गणीदार मिळताच पुस्तकें छापण्यास सुरुवात करणार आहों. किंमत ४ आणे.

--------------------
शाळाखात्याने मंजूर केलेले
चक्रवर्ती बादशहा पांचवे जॉर्ज.

 सदर्हू पुस्तक सन १९११ सालच्या दिल्ली-दरबारचे मंगल प्रसंगाचे स्मरणार्थ मुद्दाम मुलांकरितां छापून तयार केले आहे. सुप्रसिद्ध वर्तमानपत्रे. मासिक पुस्तकें व विद्वान् लोक यांचे उत्तम अभिप्राय आहेत, किंमत २ आणे. सर्व पुस्तकांस टपाल खर्च निराळा पडेल.

पत्ता -गणेश रंगनाथ दिघे,
   महाड, जिल्हा कुलाबा.
--------------------