पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      नारळीचे झाड.      ६१

-----

गिराच्या चोया करितात. पत्रावळी करण्याचे कामीं त्यांचा चांगला उपयाग होते. पोईच्या बाहेरुन जी पिसुरडी निघते, ती तेलाशिवाय मशालीसारखी जळते. नारळाच्या वरची सोडणे पाण्यांत कुजवून ती ठेचून त्यापासून जे तंतु काढतात, त्यांस काथ्या म्हणतात. या काथ्याने लोडें, गाद्या, तक्के वगैरे भरितात व याच्या चटया विणतात. त्यांसच ‘काॅॅयर म्याटिंग' असे म्हणतात, काथ्या वळून त्याचे लहान मोठे दोर, चऱ्हाटें, दावी, शिंकी वगैरे अनेक वस्तु करतात. काथ्याची दोरखंडे खाऱ्या पाण्यांत लवकर कुजत नाहींत. काथ्याशिवाय सोडणाचा जळणाच्या कामही चांगला उपयोग होतो. या जळणाच्या सोडणांना हजारीं तीन साडेतीन रुपये पर्यंतही भाव येतो. नारळाच्या डोक्याचे ठिकाणी भोक पाडून आतील गीर काढतात आणि त्याचे गुडगुडीचे सुंदर बेले करितात, तसेच त्याचे पेले व दुसरी पात्रे करून त्यांवर उत्तमप्रकारची नक्षी काढितात. गरीब लेाक करटीचे डवले करून पळी ऐवजी त्यांचा उपयोग करितात. जिलबी पाडण्याकरिता जिलबी पात्र मिळण्यासारखें नसेल तर नारळाच्या बेलीनेही जिलब्या पाडण्याचे काम करितां येते. करट्या जाळून त्याचे दांतवण करितात. दांत दुखत असल्यास करटीचे तेल लावल्याने गुण येतो. हे तेल पाडण्याची रीत अगदी सोपी आहे. करटी चुलीत टाकावी आणि तिने पेट घेतला म्हणजे ती जळती करटी बाहेर काढून उपट्या ताटावर अगर पितळीवर तशीच जळू द्यावी. थोड्याच वेळांत करटींतील तेल ताटाचे पष्ठभागावर जमू लागते, तेल पड़तांच ते बोटावर घेऊन दातांस चोळावे. करटीचे उष्णतेने ताट बरेच तापते; यासाठी तेल बोटावर घेतांना थोड्या सावधगिरीने घ्यावे. नाहींपेक्षां बोट भाजण्याचा संभव असतो. या तेलांत असेटिक आसिड व डामर असल्यामुळे गजकर्ण व नायटे यांस हें तेल लाविल्याने गुण येतो. सोडणाप्रमाणे करट्याही जळणाच्या उपयोगी पडतात. नासकें खोबरें महाग असते, तेव्हां हिलालामध्ये करट्या जाळण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. करटीचा कोळसा हा फार तलख असतो, यामुळे गोमांतक व कर्नाटक या भागांत सोनार, कासार, लोहार वगैरे लोक याच कोळशाचा उपयोग करतात. करटीची बटणे फार चांगली होतात. वेंगुर्ले, रत्नागिरी वगैरे ठिकाणी ही बटणे तयार होतात. उद्योग माणसाने करटीची बटणे करण्याचा प्रयत्न अवश्य करुन पहावा. झाडांतील गाभ्याची व फांदीच्या अगदी कोवळ्या शेंड्याची भाजी करतात. माडाच्या झाडापासुन " माडी " काढितात, ती पितात; अगर तिजपासून दारू व गूळ करतात. माड़ी काढल्याने नारळाचे पीक जरी कमी होते, तरी माडी काढावयास दिलेल्या प्रत्येक माडाचे गोमांतकाकडे दरसाल तीन रुपयेपर्यंत आणि