पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/७०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


६०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

औषधि आहे. झोप येत नसल्यास जवसाचे व एरंडबीजाचे तेल समभाग एकत्र करून काशाचे पात्रांत काशाचे पात्रानेच खलून, त्याचे अंजन करावें म्हणजे झोप येते. जवसाचे तेल व चुन्याची निवळी एकत्र करून अग्निदग्ध व्रणावर लावल्यास तत्काल गुण येतो. जवसाचे पिठाचे पोटीस करून बद व गळू वगैरेवर बांधतात, मुत्रदाहावर जवसांचा उपचार फार गुणावह आहे.

--------------------
३९ नारळीचे झाड.

 हिंदस्थानचा पश्चिम आणि पूर्वकिनारा हें नारळाच्या झाडाचे उत्पत्तिस्थान होय. कोंकण प्रांती यास माड असे म्हणतात. हिंदुस्थानांत सुमारे पांचलक्ष एकर जमीन या झाडांच्या लागवडीकडे गुंतलेली आहे. नारळाचे झाड चाळीस पन्नास हात उंच वाढते; त्याला आडव्यातिडव्या डाहळ्या फुटत नाहीत. त्याच्या शेंड्याला मात्र झावळ्या येतात. त्या पांच सहा हात लांब व तीन चार हात रुंद असतात. त्या वाळल्या म्हणजे गळून पडतात मग दुसऱ्या येतात. जुन्या झावळ्या जेथून गळून पडतात. तेथे झाडास कंगोरा पडतो. नारळाचे झाड सात आठ वर्षांनी लागास येते. माड लागास आला म्हणजे झावळ्यांत एक मोख येतो. त्यास पोय किंवा पोगी असे म्हणतात. पोय सुमारे पंध्रा दिवसांनी फुलू लागते. त्यांतील बरीचशी फुलें गळून पडतात. आणि कांहीं थोड्या फळांना नारळ धरतात, नारळ पांच सहा महिन्यांचा झाला म्हणजे त्यास शहाळे व जून नारळास रुमडा असे म्हणतात. रुमड्याच्या बाहेरच्या भागात सोडण किंवा चवड व चवडाच्या आतील तंतूस काथ्या अशी नांवें आहेत. काथ्याच्या आतील अंगास नारळ असतो. जमीन चांगला असेल, तर नारळीचे प्रत्येक झाडापासून दरसाल चार पांचशे देखील नारळ निघतात. नारळ सर्वांनी पाहिलेला आहेच; करितां ज्यास्त माहिती देण्याचे कारण नाही.

 नारळाचे झाड अत्यंत उपयोगी आहे. ते इतके की, त्यांचा कोणताही भाग टाकाऊ नाही, आणि हे त्याचे उपयोग लक्षात आणूनच एका ग्रंथकाराने त्यास भू-लोकचा ' कल्पवृक्ष ' असे नांव दिले आहे. नारळीचे लाकूड बळकट व चिवट असल्यामुळे गरीब लोक या झाडाच्या सोटाचे खांब. तुळया, वासे, ओमण वगेरे करितात. हा सोट सरळ असतो, यामुळे तो कोरून बागेतून व मळ्यातून याचे पन्हळ करितात. झावळ्याच्या पाणी विणून त्याचे झाप करितात. या झापांनी मांडव व हंगामी वखारी शाकारितात. पातीच्या हिराचे सराटे करितात. वळीचा मधला दांडा ज्यास पिढा म्हणतात, त्याच्या वरची साल काढून तिचा वाख करितात, आणि आंतील