पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      पोपया.      ५९

-----

फारच गुळगुळीत असतात; जवस मधुर, स्निग्ध, गुरु उष्ण, बलप्रद्, पाककाळी तिखट व कडू असून कफ, वात, व्रण, पृष्ठल, सूज, पित्त, शुक्रधातु यांचा नाश करणारे आहेत. जवसाला फार पाऊस सोसत नाही, यामुळे कोंकणांत आणि मावळांत जवसाचे पीक होत नाहीं. जवस हे धान्य खाण्याचे उपयोगी नाही. तथापि गोरगरीब लोक वेळ पडल्यास जवस भाजून खातात. जवसाची चटणी करतात. जवसाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे त्यापासून मिळणारे तेल हा होय. इंग्लंड व फ्रान्समध्ये वाफेच्या यंत्राच्या साह्याने जवसाचे तेल काढितात. त्यात 'बेलतेल ' असे म्हणतात. सन १८९३।९४ साली साडेसात कोट रुपयांचा जवस हिंदुस्थानांतून निर्गत झाला. इंग्लंडमध्यें जवस घोड्यांना घालतात. जवसाचे तेल रोगणास व यंत्रांस लावण्यास खपते. जवसाची पेंड जनावरांना खाण्याला व खताला उपयोगी पडते. जवसाच्या झाडापासून उत्तम प्रकारचा वाख निघतो. ‘लिनन ' आणि ' क्यांंब्रिक ' नांवाचे बारीक कापड याच वाखाचें करितात. परंतु आपल्या इकडे जवसापासुन वाख काढण्याचा प्रयत्न फारसा कोणी करीत नाही. ज्या झाडांचा वाख चांगला निघतो, त्या झाडांस बी कमी येते. अशी आपल्याकडे समजूत आहे; परंतु रशियांत एकाच झाडापासून हे दोन्ही हेतु चांगले साधतात, असा तिकडे अनुभव आहे. जवसाचा वाख आंतील सळ्या यांपासून कागद तयार करतात. हाताने कागद करण्याची कृति मागे बत्तिसाव्या भागात " वेळू " या प्रकरणांत दिली आहे. आमच्या इकडे हाही प्रयत्न आजवर झाल्याचे दिसुन येत नाही. जवसाच्या झाडाचे असे महत्वाचे उपयोग होण्यासारखे असून, आमच्या इकडील शेतकरी लोक ती झाडे निवळ फेकून देतात. तरी जवस पिकणाऱ्या भागांतील कल्पक लोकांनी हे प्रयत्न अवश्य करुन पहावे, विशेषतः धाग्यासाठी जवसाची लागवड करणे असेल तर जवसाचे बी दाद पेरावे म्हणजे झाडे सरळ वाढून त्यापासून चांगले धागे निघतात. पेरण्याकरितां बी घ्यावयाचे ते परदेशांतील घ्यावे, कारण त्या बीजापासून होणाऱ्या झाडाचे दांडे जाड व नरम असतात व त्यामुळे त्यांचा वाख काढण्यास सुलभ पडते. बी पिकून तयार होण्यापूर्वी जवसाची झाडे मुळासकट उपटावी. नंतर दुसरे दिवशी त्यांवरील जवसाची बोंडे काढून घ्यावी आणि तिसऱ्या दिवशी झाडांचे भारे बांधून पाण्यात भिजत घालावे. बोंडे तीस तासपर्यंत सांवलीत ढीग करून ठेवावी म्हणजे त्यांस चांगली ऊब येते. नंतर ती उन्हांत वाळवावी म्हणजे बोंडे तडकून त्यांतील बी काढण्यास सोपे जाते. जवसाच्या लागवडीबद्दलच्या या विशेष सुचना बेलजियममधील एका तज्ज्ञ गृहस्थाने बंगाल्यांत आल्यावेळी केलेल्या आहेत. जवसाचे तेल