पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      आल-सुरंजी.      ५१

-----

.

ण्याचे कामीं उपयोग होतो. कंवठाचे झाडापासून उत्तम गोंद निघतो, त्याजपासून काळी शाई करितात.

--------------------
३४ आल ( सुरंजी. )

 ही झाडे हिंदुस्थानांत पाहिजे त्या ठिकाणी होतात. मुंबई इलाख्यांत खानदेश, सोलापूर आणि गुजराथ या भागांत या झाडांची विशेष लागवड करतात. नेमाड प्रांतांतील " आली " जातीच्या लोकांना या झाडांची लागवड हे एक उपजीविकेचे मुख्य साधनच आहे. या वृक्षाला संस्कृतांत अच्युतवृक्ष, मुसलमानीत सुरंजी, गुजराथी व हिंदी भाषेत आल, मद्रासेकडे तेलगू भाषेत तोगरू व आपल्या इकडे मराठी भाषेत नागकुड़ा अशी नावे आहेत. या झाडाच्या मुळ्यांत व सालींत तांबडा रंग असतो. या रंगाने कापसाचे कपडे, सुत व खारवे रंगवितात. बंगाल प्रांतांत तर रेशीम रंगविण्यालाही याचा उपयोग कारितात. सालींतील रंग मुळ्यांच्या रंगासारखा चांगला नसतो, त्यांत पिवळट रंगाची झांक ज्यास्त असते. यामुळे सालीचा रंग फारसा काढीत नाहीत. म्हैसूर व बुंदेलखंड येथील झाडें रंगाचे कामीं उत्तम असे समजतात. हे झाड चांगले वाढण्यास तीन साडेतीन वर्षे लागतात. त्यावेळी याची उंची दोन सवादोन फूट असते, ज्यास्त मुदतपर्यंत झाडे राहिल्यास त्यांचा रंगाचे काम चांगला उपयोग होत नाहीं. सुरंजीच्या रंगानें कपडे व सुत रंगविण्याच्या निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळया रीति आहेत. सुरंजीच्या मुळ्यांची पूड करण्याची रीतः- पक्के सहा शेर सुरंजीच्या मुळ्या घेऊन त्या ठेचून त्यांची बारीक पूड करितात; त्या पुडीत पावशेर तिळाचे तेल घालून ती कुटतात; नंतर पुन्हा एकवार पावशेर तेल घालून कुटतात म्हणजे रंगीत द्रव्याची बारीक पूड तयार होते. सुत किंवा कपडा धुण्याची रीत खाली लिहिल्याप्रमाणेः

 सूत अथवा कापड प्रथम स्वच्छ पाण्यांत चांगले धुऊन टाकावे. नंतर एरंडेल आणि पापडखाराच्या पाण्यांत ते भिजत घालून ठेवावे. दुसरे दिवशी ते साफ धुऊन सात आठ तासपर्यंत उन्हांत वाळवावे. नंतर पुन्हा पाण्यात भिजवून दांडक्याने बडवून तो गोळा रात्रभर तसाच ठेवावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्ववत वाळवावा. याप्रमाणे आठ दिवसपर्यत कृति करून नंतर नववे दिवशीं तें सूत अथवा कापड स्वच्छ धुऊन वाळवावे. नंतर तुरटीचे पाण्यांत सुरंजीच्या मुळ्यांची पूड टाकून त्या मिश्रणांत ते सुत अगर कापड चार दिवसपर्यंत भिजत घालावे. मधून मधून कापड खाली-वर करीत जावें. पांचवे दिवशी ते स्वच्छ धुऊन वाळवावे आणि सरते शेवटी पापडखाराच्या पाण्यात भिजवून वाळवावे. पापड़वाराने रंगास तकाकी येते,