पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


५०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

 खडीसाखर सोळा तोळे, वंशलोचन आठ तोळे, पिंपळी चार तोळे, वेलची दोन तोळे, दालचिनी एक तोळा, ही सर्व औषधे कुटून त्यांचे जें चूर्ण करतात, त्यास सीतोपला चूर्ण असें म्हणतात, हे चूर्ण मध व तूप यांमध्ये मिश्र करुन सेवन करावे; लहान मुलांना डांग्या खोकला म्हणून जो भयंकर खोकला होतो, त्यावर वंशलोचनाचे चूर्ण मधाशी द्यावे किंवा वेळूची गांठ पाण्यांत उगाळून पाजावी. पारा अंगांत राहिला, तर वेळूच्या पाल्याच्या ४ पैसे भार रसांत पैसाभार साखर घालून तो रस पाजावा. वेळूच्या पाल्याचा रस काढण्याचे काम मात्र बरेच कठीण आहे. वेळूचा पाला हातावर चोळल्याने किंवा ठेचल्यानेंही पाण्याचे साह्यावांचून त्याचा रस निघत नाही. वेळूचा पाला गाई, म्हशी, बकरी वगैरे जनावरे मोठ्या आवडीने खातात.

--------------------
३३ कंवठ.

 कंवठाची झाडे विशेषतः महाराष्ट्रांत व गुजराथेंत होतात. या झाडाला आठवे वर्षी फळे येऊ लागतात. त्यांस कंवठे असे म्हणतात. ही फळे उदी रंगाची असून आंब्याएवढी मोठालीं असतात. कंवठाचा हंगाम कार्तिकापासुन चैत्रापर्यंत असतो. ही फळे हत्ती व वानर फार आवडीने खातात. कंवठाचे फूल विषनाशक असून, पाने वांति, अतिसार आणि उचकी यांचा नाश करणारी आहेत. कंवठाचे कवच बेलफलाप्रमाणे कठीण असते. पिकलेले कवठाचा मगज मऊ आणि गुळमट असतो. हिरवे कंवठाचा मगज पांढरा असून तो तुरट लागतो. अंगावर पित्ताच्या गांधी उठून दाह होत असेल, तर कंवठाचे पानाचा अंगरस काढून तो अंगास चोळावा व थोडी खडीसाखर घालून पिण्यास द्यावा, म्हणजे गांधी मावळून दाह शांत होतो. कंवठाचा मगज साखर घालून सेवन केला असता त्याने पित्तशमन होते. पिकलेल्या कंवठाच्या मगजाचा मुरंबाही करतात. किंतीएक लोक पिकलेलें कंवठ नुसतेच साखर किंवा गूळ घालून खातात. हिरव्या कंवठाच्या मगजाचे सार, कोशिंबीर, चटणी वगैरे पदार्थ करतात. सापसंद, द्राक्षे, पांढरी किन्हीं व दैतीमुळ ही औषधे एक एक भाग आणि तुळशीची पाने, कंवठ, बेल व डाळिंब हीं अर्धा अर्धा भाग घेऊन त्यांचा अगद मधांतून दिला असता तो विशेषतः मंडली सापाच्या (कवड्या साप) विषावर गुणकारक असल्याचे अष्टांगहृदयांत वर्णन आहे. कंवठाच्या बियांचे तेल काढितात. हे तेल उंदराच्या विषावर गुणावह आहे. फळाचे बेलीचा दारुकामांत फार उपयोग करतात. तसेंच बेलफळाच्या कवचाचाही डब्या, मुलांची खेळणी वगैरे जिनसा कर-