पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

लोणचें करितात. वैद्यकशास्त्रांत ' वंशलोचन' म्हणून जी महत्त्वाची औषधि सांगितली आहे, ती वेळूपासूनच मिळते. वेळूच्या झाडाच्या गांठीच्या ठिकाणी रस सुकून त्या रसाचा दगडासारखा एक पांढरा घट्ट पदार्थ बनतो, त्यासच ' वंशलोचन ' असं म्हणतात. कागद करण्याच्या कामींही बांबूचा उपयोग होतो. बांबपासून कागद करण्याचे जे अनेक प्रयोग आजपर्यंत करून पाहिले, त्या सर्वांत अमेरिकेतील थॉनस रूटलेज नांवाच्या गृहस्थाचे प्रयत्नास चांगले यश आले आहे. ते म्हणतात की, ' कोवळे बांबू घेऊन कागद करण्याचे कामीं त्यांचा उपयोग केल्यास खात्रीने उत्तम प्रकारचा कागद तयार होतो. जून बांबूमध्ये वालुकामय पदार्थ फार असतो व तो नाहीसा करण्याचे काम फार अवघड आहे, यासाठी कागद करण्यास कोवळ्या बांबूचाच उपयोग करावा. ' कागद करण्याचे काम फार अवघड आहे, यासाठी ते करण्याचे काम बांबूंचा उपयोग करणे असेल, तेव्हां कोवळे बांबू घेऊन ते चुन्याच्या पाण्यांत कांही दिवस भिजत घालावे म्हणजे बांबूंच्या वरील कठीण कवच मऊ होते. आणि त्यायोगाने त्याचा कुट्टा करण्यास सोपे पडते. चीनमध्ये हल्ली याच रीतीने कागद तयार करतात. रूटलेजने अशी रीति काढिली आहे की, पुष्कळ दाबाने दोन रूळांतून बांबू प्रथम चिरडून काढावेत आणि नंतर त्यांत एकादा क्षार घालून शिजवावे. ओल्या व कोवळ्या बांबूंत शेकडा ७५ भाग ओलावा असतो आणि शिल्लक राहिलेल्या चौथ्याचाहि शेकडा साठ भाग कागद उतरतो. या करितां ज्या ठिकाणी बांबूची पुष्कळ उत्पत्ति होते व त्याच ठिकाणी कागद तयार करण्याजोगा कुट्टा तयार करून नंतर तो कुट्टा कागद तयार करण्याचे कारखान्यांत पाठवावा, म्हणजे बांबू नेण्याचा खर्च पुष्कळ कमी पडेल. ' कुट्टा तयार झाल्यानंतर त्याचा हाताने कागद करण्याची हिंदुस्थानांतील रीति खालील प्रमाणे आहेः--

 प्रथम कुट्टा नदीवर नेऊन धुतात, नंतर त्यांत चुन्याचे पाणी घालून सात आठ दिवसपर्यंत त्याची रास करून ठेवतात. सात आठ दिवसांनंतर पुन्हां कुटून चार दिवस राहू देतात. चार दिवसानंतर पुन्हां धुतात. नंतर मणभर कुट्यांत सव्वाशेर पापडखार या प्रमाणाने पापडखार मिसळून ते मिश्रण कुटून एकरात्र तसेच राहू देतात. व दुसरे दिवशी पुन्हा धुऊन आणितात. पुन्हा दरमणी एक शेर खार घालून उन्हांत ओपून तीन चार वेळ कुटतात. नंतर एकरात्र पाण्यात ठेवून दुसरे दिवशीं धुऊन आणितात. नंतर दरमणी दीड शेर गांवठी साबण घालून उन्हांत ओपतात. नंतर विशेष मेहनतीने पुन्हा एकवार धुऊन आणितात. या प्रमाणे धुण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर तो कुट्टा एका चुनेगच्ची हौदांत घालुन त्यांत ज्या मानाने कागद जाड किंवा पातळ करणे असेल, त्या मानाने पाणी