पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      कोरफड.      ४१

-----

झाड ही मोठी दिव्यौषधि असें मानून, या झाडाची फार जोपासना करीत. डाळिंबीच्या झाडाची व मुळाची साल यांचा काढा करून जंतविकारावर देतात. डाळिंबीच्या फळांची टरफलें फार तुरट असतात. या टरफलांचा वैद्य शाखांत खालीलप्रमाणे उपयोग दिला आहे.

  दाडिमी द्विपला ग्राह्या खंडा चाष्टपलापि च ।
  त्रिगंधस्य पलं चैकं त्रिकुटं स्यात्पलत्रयम् ।
  एतदेकीकृतं सर्वं चूर्णंं स्याद्दाडिमाष्टकम् ।
  रुचिकृद्दीपनं कंठ्यं ग्राहि कासज्वरापहम् ॥
      ' शांर्ङगधर '
 वरील श्लोकांत-डाळिंबसाल आठ तोळे, खडीसाखर बत्तीस तोळे, त्रिगंध (दालचिनी, विलायची आणि तमालपत्र ) एक पळ व त्रिकटु ( सुंठ, मिऱ्येे, पिंपळी) एक पळ घेऊन, त्या सर्वांचे चूर्ण करावें; याला 'दाडिमाष्टक' म्हणतात. हे चूर्ण घेतल्याने तोंडास रुचि येऊन अग्नि प्रदीप्त होतो. हे चूर्ण कंठास हितकारक असुन याने मलाचा अवष्टंभ होतो; व यापासुन कास व ज्वर यांचा नाश होतो;- असे सांगितले आहे, डाळिंब खाण्यास चवदार व शरिरास हितकारक असे आहे. हे खाल्ल्याने शरिरास हुशारी चेऊन तहान मोडते. रोगी माणसालाही डाळिंब खावयास देतात. डाळिंबाच्या दाण्याच्या रसाचा पाक करतात. त्याला डाळिंबपाक असे म्हणतात. डाळिंबाचा रस पित्तशामक आहे. या रसाचा शिरका करतात. डाळिंबपाकाचा औषधांत उपयोग होतो. आंबट, तुरट आणि कडवट अशा डाळिंबाचे सरबत करतात. असे या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. व्यापारसंबंधी या झाडाचा फळाशिवाय दुसरा उपयोग म्हटला म्हणजे या झाडाची व मुळाची साल आणि फळांची टरफलें पिवळा रंग करण्याचे कामीं येतात. मोरक्को लेदरला हाच पिवळा रंग देतात.

--------------------
२९ कोरफड.

 कोरफडीला संस्कृतांत घृतकुमारी किंवा कुमारी असे नांव आहे. कोरफडीची पाने खड्गाकार, जाड, दळदार व फिट हिरव्या रंगाची असतात. कोरफडीची लागवड फारच जलद होते. जमीन खराब असून अतिशय कोरड असली, तरी तशा जमिनींतही कोरफडीची वाढ जोराने होते. इतकंच नाही, तर कोरफड निवळ हवेवर टांगून ठेविली, तरीही तिची थोडथोडी वाढ होत असते. कार्तिक मार्गशीर्ष या महिन्याच्या सुमारास कोरफडीला मधून दांडा फुटून वर तुरे येतात.