पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      आंवळी.      ३९

-----

लावितात. कॉलऱ्याच्या विकारांतील उलट्या बंद होण्याकरितां वाळ्याचे थोडेसे अत्तर पिण्यास देतात. डोके दुखत असल्यास वाळा व ऊद एकत्र करून त्याची विडी करून ओढतात. अशा प्रकारचे पांढऱ्या वाळ्याचे आणखीहीं कांहीं औषधि उपयोग आहेत. हिंदुस्थानामध्ये वाळ्याला 'खस' असे म्हणतात, याचे अत्तर पाण्याच्या मदतीने काढावे लागते. अजमिराकडे वाळ्याचे अत्तर काढण्याचे कारखाने आहेत. आपण वाळा म्हणून जो वापरतों, तो या गवताच्या मुळ्या होत. या मुळ्या शीतल असून फारच, सुगंध आहेत. वाळ्याच्या मुळ्यांचे पडदे, पंखे, करंड्या वगैरे अनेक व्यापारोपयोगी जिन्नस तयार करतात. या जिनसांना किंमतही चांगली येते. सदर्हू जिनसा तयार करण्याला विशेष कसब नको. कल्पक मनुष्याने त्यांचे नमुने एक दोन वेळ पाहिल्यास त्यास या जिनसा सहज करता येतील. वाळा सुवासिक असल्यामुळे उदबत्त्या वगैरे सुगंधि जिन्नस तयार करण्याच्या कामी याचा उपयोग होतो. उदबत्ती करण्याचे काम फारसे अवघड नाही. तिच्या उंची, मध्यम च हलकी अशा निरनिराळ्या प्रकारांमध्यें मसाल्याचे प्रमाण निरनिराळे असते, ते माहित असले म्हणजे कोणालाही उदबत्त्या करता येतील. मध्यम प्रतीची उदबत्ती करण्यास . मसाल्याचे जिन्नस खालील प्रमाणाने घ्यावे.

भाग-जिनसाचें नांव. भाग-जिनसांचें नांव. भाग-जिनसांचे नांव.
१८ चंदन.  नागरमोथे.  दालचिनी.
 ऊद.  जायफळ. १३ मैदालकड़ी.
 कृष्णागर.  जायपत्री. १० कोळसा.
 वाळा.  वेलदोडे.  शिलारस.
 धूप.  दवणा. १० गूळ.
 गुलाबकळी.  कापुरकाचरी.

 वरील प्रमाणाने सर्व पदार्थ घेऊन ते ( शिलारस व गूळ शिवाय) निरनिराळे कुटून वस्त्रगाळ करावे. वाळा व चंदन हे दोन जिन्नस कितीही कुटले, तरी त्यांचे चारगट फार राहते; म्हणून राहिलेले चारगट जात्यानें दळून वस्त्रगाळ करावे. नंतर कढत पाणी घेऊन त्यांत कोळशाशिवाय वरील सर्व जिनसांचे चूर्ण, गूळ व शिलारस ही घालून तो सर्व मसाला एकत्र कालवून कणकीचा जसा चिकट गोळा होता, तसा त्याचा गोळा करावा. नंतर सुमारे एकोणीस बोटें लांबीच्या काड्या किंवा चोया, एक गुळगुळीत पाटा, कोळशाची वस्त्रगाळ केलेली पूड व तो मसाल्याचा गोळा, इतक्या जिनसा जवळ घेऊन बसावे. नंतर कोळशाची थोडीशी पूड पाटावर टाकावी आणि मसाल्याच्या गोळ्यांतून थोडासा मसाला घेऊन, तो एका काडीच्या मधोमध लावावा आणि ती काडी पाटावर