पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

काळ गाईचे अदमुऱ्या दह्यांतून घेतल्यास रक्तीमूळव्याध जाते. तींच सालें जाळून त्यांची राख प्रत्येक वेळी सहा मासे याप्रमाणे नवटांक नारळाचे आंगरसांत पांच दिवसपर्यंत शीतप्रमेहावर दिल्यास गुण येतो. सदर्हू औषध चालू असतां अळणी खाल्ले पाहिजे. तीच राख दर खेपेस चार तोळेपर्यंत शेळीचे मूत्रांतून पंडुरोगावर देण्याची वहिवाट आहे. चिंच रक्त शुद्ध करणारी असून पाचक आहे. तांबे, रुपे वगैरे धातूंच्या जिनसा निर्मळ करण्याकरितां चिंचेने घासतात. पावसाळे दिवसांत चिखलाचे योगानें पायांच्या बोटांची बेचके कुजून जो ‘चिखली' म्हणून रोग होतो, त्यास चिंच लावल्याने गुण येतो. पाकशास्त्रांतील चिंचेचे उपयोग सर्वांना पूर्णपणे अवगत आहेतच, तेव्हां ते सांगण्याची आवश्यकता नाही. आता फक्त चिंचेच्या बिया ज्यांस चिंचोके असे म्हणतात व जे अगदी निरुपयोगी असे समजून आपण फेकून देतो, त्यांजबद्दलची थोडीशी माहिती देऊन हे वर्णन पुरे करू. गरीब लोक चिंचोके भाजून व शिजवून खातात. चिंचोक्याचे भुकटींत सरस घालून त्यांचा रांधा केला असतां, त्यापासुन लांकडासाठीं एक प्रकारचे उत्तम लुकण तयार होते. चिंचोक्याची खळ करितात. ती कापड व कागद चिकटविण्याचे कामी येते. धनगर लोक चिंचोक्याचा रांधा करून खळ करितात, आणि ती घोंगड्या, बुर्णूस, कांबळी इत्यादिकांस देतात. या खळीचे योगाने त्यांस ताठपणा येतो. तांबडी चिंच म्हणून जी चिंचेची एक जात वर सांगितली, तिच्या चिंचोक्यापासून उत्तम प्रकारचे तेल निघते. आपल्या इकडील चिंचेच्या चिंचोक्यांपासूनही तेल निघेल, असे एका ग्रंथकाराचे म्हणणे आहे; तरी उद्योगी माणसाने हा प्रयत्न अवश्य करून पहावा. तेलंगणांत चिंचेचे झाड ज्याच्या दाराजवळ असेल, तो मोठा सुखी असे समजतात.

--------------------
२५ केळ.

 केळीची झाडे हिंदुस्थानांत बहुतेक सर्वत्र होतात. त्यांत समुद्रकिनाऱ्यास विशेष होतात. हे झाड साधारणपणे आठ दहा फूट उंच वाढते, तथापि कांहीं जातींची झाडे तीन चार फुटांपेक्षां ज्यास्त उंच वाढत नाहीत व कांही जातींचीं पंधरा फूटपर्यंतही वाढतात. सर्व वनस्पतिवर्गात केळीच्या पानाइतके मोठे पान कोणत्याच वनस्पतीचे नाही. या झाडाच्या मधल्या गाभ्यास ‘कालें' व वरील वेष्टवास ' सोपट' अशी नावे आहेत. या झाडाला जें फूल येते, त्यास ' केळफूल' व फळाच्या घडाला ' लोंगर' अशी नावे आहेत. केळीच्या सुमारे वीस जाति आहेत. त्याशिवाय रानांत आपोआप वाढणारी केळीची एक जात आहे, तिला 'चवेण ' किंवा 'रानकेळ' असे म्ह्ण-