पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      चिंच.      ३३

-----

प्रथम तुरटीचे पाण्यात भिजवून नंतर या रंगांत बुडवून काढतात. कपड्याला सर्वत्र सारखा रंग लागला म्हणजे तो कपडा साधारण पिळून वाळवितात. रंग पक्का बसण्याकरिता कपडा रंगांत भिजवून वाळविण्याची क्रिया अनेक वेळा करावी लागते. पतंगाच्या लाकडाच्या कषायावर निरनिराळ्या रासायनिक पदार्थांची निरनिराळी कार्ये होतात. परंतु त्यासंबंधाची माहिती येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. आता फक्त पतंगाच्या लाकडापासुन व्यापारोपयोगी तयार होणारा जिन्नस जो गुलाल त्यासंबंधाची माहिती या भागांत सांगावयाची आहे. गुलाल तयार करण्याकरितां तांदुळाचें अगर नाचणीचे पीठ किंवा आरारूट या जिनसांचा उपयोग करतात, हे पूर्वी सांगितलेच आहे. आपल्या इकडे आरारूट महाग मिळत असल्यामुळे, तांदुळाचे अगर नाचणीचे पीठ घेणेच फायदेशीर आहे. तांदुळाच्या कण्या प्रथम धुवून वाळवाव्या. वाळल्यानंतर दळून त्वांचे पीठ तयार करावे. नंतर शेरभर कण्यांचे पिठांत दोन तोळे पापडखाराचे पाणी करून त्यांत ते पीठ भिजवून गोळे बांधावे; व ते गोळे सावलीत वाळवावे नंतर पतंगाच्या लांकडाचा वर सांगितल्याप्रमाणे रंग तयार करुन ते गोळे फोडून त्याचे पीठ करून त्या रंगांत भिजवावे आणि ते मिश्रण सावलीत वाळवावे, अशा तऱ्हेनें जितकी ज्यास्त पुटें द्यावी, तितका गुलाल ज्यास्त रंगदार होतो.

--------------------
२४ चिंच.

 चिंचेची झाडे आपल्या देशात सर्वत्र आहेत; परंतु त्यांत तांबडी चिंच म्हणून जी जात आहे, ती मात्र फारशी कोठे आढळत नाहीं. चिंचेचे झाड घरानजीक असल्यास त्या घरात राहणाऱ्या लोकांस नेहमी सरदीचे विकार भोगावे लागतात, यामुळे ही झाडे बहुधा कोणी घराजवळ लावीत नाहींत. परंतु सिलोन बेटांतील लोक आपली घरे मुद्दाम या झाडाच्या गारव्याला बांधतात. चिंचेच्या झाडाचा बुंधा मोठा असून त्याचा विस्तारही पुष्कळ होतो चिंचेच्या झाडाला आठ नऊ वर्षांनी चिंचा येऊ लागतात. चैत्राच्या समारास या झाडाला नवी पालवी फुटून, त्याच वेळी फुलेही येऊ लागतात. माघ महिन्याचे सुमारास चिंचा पिकून तयार होतात. पिकलेल्या चिंचेचा एकेक आंकडा वीत पाऊणवीत लांब असतो. चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी करितात, परंतु ती फार आंबट असते. चिंचेच्या फुलांची चटणी करितात. चिंचेचे लांकड फार चिवट आहे, यामुळे त्याच्या उखळ्या, चोपणी, चरक, तेलाचे घाणे वगैरे जिनसी करितात. हत्यारांना दांडे घालण्याच्या कामही या लाकडाचा उपयोग होतो. चिंचेच्या झाडाला जी बाहेरून खरबरीत काळी साल असते, तिचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते प्रत्येक वेळी दोन तोळे या प्रमाणाने रोज सकाळ सायं-