पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      दुध्याभोपळा.      ३१

-----

कमाविणारे कारखानदारांकडे पाठवून द्यावे. असे केल्याने दुहेरी फायदा होणार आहे. बाभळीच्या झाडाचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हटला म्हणजे या झाडापासून मिळणारा डिंक हा होय, खैर, शेवगा, वगैरे झाडांपासूनही डिंक निघतो; परंतु त्या सर्वांत बाभळीचा डिंक पहिल्या प्रतीचा आहे. हा डिंक पांढरा असतो, बाभळीच्या झाडास स्वाभाविकरीत्या पडलेल्या व मुद्वाम पाडलेल्या चिरांतून हा डिंक वाहत असतो. प्रथम तो दाट रसासारखा असतो; परंतु लागलाच हवेने घट्ट होतो. हा डिंक प्रकाशभेद्य असून, थंड पाण्यात विद्रुत होतो. रंगाच्या व चिकटविण्याच्या कामी याचा उपयोग होतोच, परंतु विशेषतः खाण्यासाठी याचा फार खप होतो. हा डिंक पौष्टिक असल्यामुळे, बाळंत झालेल्या बायकांना याचे लाडू करून देण्याची आपल्या इकडे फार वहिवाट आहे. बाभळीचे ओलें काष्ठ दंतधावनास घेतात. बाभळीची व जांभळीची आंतली साल यांचा काढा करून त्यांत तुरटीची लाही घालून गुळण्या केल्यास मुखरोग बरे होतात. सर्पाचे मेंगेस बाभळीचा गोंद लावून त्याची पट्टी बदावर दिल्यास गुण येतो. बाभळीच्या बियांचे चूर्ण तीन दिवस मधाशी खाल्ले असतां अस्थिभंग दूर होऊन अस्थि वज्राप्रमाणे बळकट होतात. निष्कंटक बाभळीच्या पानांचा अंगरस काढून तो घेतल्यास अनेक प्रकारचे अतिसार दूर होतात. असे या झाडाचे अनेक उपयोग आहेत.

--------------------
२३ दुध्याभोपळा.

 दुध्या भोपळा सर्वांच्या माहितीचा आहे. यास कोणी कोणी पांढरा भोपळा असेही म्हणतात, गोमंतकाकडे यास कोकणदुधी असे नांव आहे. संस्कृतांत अलाबु, इक्ष्वाकु, वगैरे जी नांवे आहेत, ती याच फळाची. हे भोपळे बारमहा होतात, परंतु मार्गशीर्षापासून ज्येष्ठापर्यंत यांचा हंगाम विशेष असतो. लांबोडी, चपटी, तुंबडी, तंबुऱ्या अशा याच्या आकारावरून चार पांच जाति मानितात. याशिवाय कडू भोपळा म्हणून याची आपोआप होणारी एक जात आहे. या जातीची फळे अगदी कडू असतात. त्यांचा खाण्याच्या कामी उपयोग होत नाहीं. दुध्या भोपळ्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या व खिरी करितात. हें सर्वांना विदितच आहे. दुध्या भोपळा धातुवर्धक व पौष्टिक असल्यामुळे याचा हलवा करुन खातात. दुष्या भोपळ्याच्या पाल्याचा रस काढून मूळव्याधीवर त्याचा लेप करतात. याशिवाय वनस्पतीचे महत्त्वाचे असे दुसरे काहीं औषधी उपयोग नाहींत. दुध्या भोपळा फोडला म्हणजे आंतील कोंवळ्या बिया चुईमध्ये ओंवून त्या निखाऱ्यावर भाजून मुले मोठ्या आवडीने खातात. खाण्याशिवाय दुसऱ्याही अनेक कामीं या फळांचा उपयोग होतो. भोपळे