पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


३०.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

पोपयाच्या फोडी टाकल्यास मांसाची रुचि बिघडते. मांस लवकर शिजण्यासाठी ते पोपयाच्या पानांत बांधून ठेवितात; अगर त्याच्या झाडाला टांगून ठेवितात.

--------------------
२१ बाभूळ.

 बाभळीची झाडे कोंकणांत फारशीं नाहींत. कारण काळ्या जमिनीशिवाय बाभळीचे झाड होत नाही. कोकणांत जेथे काळवट जमीन आहे, तेथे मात्र ही झाडें नजरेस पडतात. देशावर सर्वत्र ही झाडे आहेत. बाभळीचे लांकुड मजबूत असून जळण्याला कणखर आहे. ते इमारतीच्या व शेतकीच्या औतांच्या उपयोगी पडते. देशावर कुळवाची दिंडे, नांगरांचे आंकडे, वगैरे याच लाकडांचीं करितात. बाभळीच्या झाडाला लांब व अणकुचीदार कांटे असतात. यामुळे या झाडाचे डहाळ कुंपणाला लावतात. डहाळ तोडल्याने झाड कमजोर न होतां उलट ज्यास्त जोराने वाढत जाते. बाभळीचे लाकूड फार घट्ट व चिवट असून पाणी खाल्लेले असले म्हणजे त्यास कीड अगर वाळवी लागत नाही. म्हणून गाड्यांची चाके, उसाच्या घाण्यांची मुसळे, खुंट्या, वगैरे जिनसा या लांकडाच्या करितात. बाभळीच्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. या झाडाच्या शेंगा लांब व करवे पडलेल्या असतात. कोवळ्या शेंगांची भाजी व लोणचें करितात, कातडी कमविण्यास व रंगविण्यास बाभळीच्या सालींचा व शेगांचा उपयोग करतात. या सालीमध्ये टॉनिक व ग्यालिक अॅसिड असून शिवाय एक प्रकारचे रंगीत द्रव्य असते. वरील दोन्ही अॅॅसिडांचा कातडी कमाविण्याचे कामी फार उपयोग होतो. चामड्यांतील प्राणिज द्रव्ये ओली असतां लवकर कुजतात; परंतु तीच या सालींतील अॅॅसिडाने पाण्यांत अविद्राव्य अशी होऊन कच्च्या चामड्याचे टिकाऊ व मजबूत असे कमाविलेले कातडे बनते. कानपूर, आग्रा, वगैरे ठिकाणी कातडी कमाविण्याचे जे कारखाने आहेत, त्यांतून याच सालीचा उपयोग करतात. बाभळीच्या शेंगांतील बी व त्यावरील साल, यांचे भिन्न भिन्न रंग होतात. बियांमध्ये मुख्यत्वेकरून लाल रंगीत द्रव्य असते, व त्याचा चामड्यास लाल रंग देण्याकरिता उपयोग करतात. बाभळीच्या सालींत व शेंगांत जे हे विशेष गुण आहेत, ते आमच्याकडील अशिक्षित लोकांस माहीत नसल्यामुळे, दरसाल हजारों खंड्या बाभळीचे लाकूड तुटून ते फक्त जाळण्याच्या उपयोगास लागत आहे. बाभळीची लांकडे तोडणे ती, रस सालीत चढल्यावर चैत्र महिन्याच्या सुमारास तोडावी; नंतर कुऱ्हाडीने सालींत आडवे कच सुमारे दोन दोन हातांच्या अंतराने पाडुन ते सालीचे तुकडे लाकडापासून सोडवावे, व उन्हांंत उभे करून सुकूंं द्यावे. सुकल्यानंतर त्यांचे गठ्ठे बांधून विक्रीकरितां कातडी