पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      गुंजवेल.      २३

-----

वगैरेवर वरून लावण्याच्या औषधांत गुंजांचे चूर्ण करून त्यांचे ' गुंजाभद्ररस' या नांवाचे एक औषध तयार करतात. त्याची कृति खालील प्रमाणे आहे :-

  निष्कत्रयं शुद्धसूतं निष्कद्वादश गंधकम् ।
  गुंजाबीजं च षण्णष्कं निम्बवीजं जया तथा ॥
  प्रत्येक निष्कमानं तु निष्कं जैपालबीजकं ।
  जयाजम्बीरधत्तुरकाकमाचीद्रवैर्दिनम् ।
  भावयित्वा वटीं कृत्वा दद्याद्वूंजाचतुष्टयम् ।
  गुंजाभद्ररसो नाम हिंगुसैधवसंयुतः ।
  शमयत्युल्बणंं दुःखमुरुस्तम्भं सुदारुणम् ॥
      'रसेंद्रसारसंग्रह.'
 जुलाब होण्यासाठी कोणी गुंजांचा उपयोग करतात, परंतु ते करणे हितावह नाहीं. कारण गुंजा विशेष दिल्यास पटकीच्या विकाराप्रमाणे जुलाब होतात. गुंजांवर जें तांबडे टरफल असते, ते विषारी असते आणि यामुळेच तांबड्या गुंजांची उपविषांत गणना आहे. डॉक्टर वॉर्डन यांनी गुंजेच्या अंगच्या विषाची परीक्षा पाहुण्याकरिता जे प्रयोग करून पाहिले, त्यांवरून असे अनुभवास आलें कीं, थोडक्या पाण्यात सुमारे अर्धी गुंज उगाळून मांजराच्या मांडीत त्याची पिचकारी मारिली, तर चोवीस तासांत मांजर मरते. पंजाब, बहार, वगैरे प्रांतांत व आपल्या इकडेही काही भागांत जनावरांना मारण्याकरिता मांग, महार, वगैरे लोक गुंजांचे विषाचा उपयोग करतात, अशाबद्ल वऱ्याच ग्रंथांतून आधार आहेत. रा. त्रिभुवनदास मोतीचंद शाह, एल. एम. चीफ मेडिकल ऑफिसर जुनागड स्टेट, हे आपल्या 'शरीर आणि वैद्यक' नांवाच्या गुजराथी ग्रंथांत लिहितात की, 'उत्तर-हिंदुस्थान आणि पंजाब वगैरे भागांतील मांग लोक ढोरांना मारण्याकरितां गुंजांची साल काढून त्यांचे बी पाणी घालून कुटतात किंवा वाटतात, व त्याच्या सुईसारख्या अणकुचीदार कांड्या तयार करून त्या सुकवून ठेवतात; आणि ज्या ढोराला मारावयाचे असेल त्याच्या कातडीत ती कांडी भोंसकतात. त्याच्या योगाने कातडीला तीक्ष्ण जखम होऊन ढोर मरण पावते. गुंजा हिरव्याच खाल्ल्या तर विषारी आहेत, परंत शिजवून खाल्ल्या तर त्यांचा विषारीपणा नाहीसा होतो, आणि म्हणूनच ईजिप्त देशांत बऱ्याचशा गुंजांचा उपयोग खाण्याकडे होती. गुंजांच्या अंगच्या विषाचे तत्त्व सार्द्र उष्णतेने साफ नाहीसे होते म्हणून गुंजा, तशाच खाल्ल्या तरी जठरांतल्या उष्णतेने व आर्द्रतेने त्यांतील विषारी गुण नाहीसा होतो. सेंटिग्रेड शंभर