पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      सांवर.      २१

-----
१४ सांवर.

 सांवरीचा वृक्ष फार मोठा होतो. वेदामध्ये याला 'यमद्रुम ' हे नांव आहे. सांवरीमध्ये पांढरी व तांबडी असे दोन भेद आहेत. सांवरीचे लाकूड पाण्यांत जास्त टिकते आणि म्हणूनच बहुतेक सर्व कोंकण प्रांती सांवरीचे बुंधे पोखरून त्यांच्या होड्या वगैरे करतात. सांवरीच्या झाडापासून उदी रंगाचा व तुरट असा एक चिकट पदार्थ स्रवत असतो, त्याला ' मोचरस' असे म्हणतात. या मोचरसाला, बाजारांत एका सुरती मणाला चार रुपये पर्यंत भाव येतो. मोचरस कामोद्वीपक, शक्तिवर्धक व रक्तस्राव बंद करणारा आहे आणि यासाठीच फाजील ऋतुस्राव, आमांश, वगैरेवर हा देतात. शक्ति येण्याकरितां मोचरसाचे चूर्ण दुधांत घालून पितात. सांवरीच्या मुळ्यांना ' मुसळी सिमूल' असे म्हणतात, या मुळ्या हलक्या असून त्यांवर पातळ साल असते. या पौष्टिक आहेत. परंतु ज्यास्त प्रमाणाने घेतल्यास उलट्या होतात. या मुळ्या सावलीत वाळवून इंद्रियशिथिलतेवर देतात. सांवरीची वाळलेली फुलें, खसखस, शेळीचे दूध आणि साखर हीं एकत्र करून शिजवून घट्ट करून त्याचे दोन द्राम दिवसांतून तीन वेळ याप्रमाणे घेतल्यास मूळव्याध बरी होते. सांवराच्या आतल्या सालीचे दोरखंडे करण्यासारखे तंतु निघतात. सांवरीच्या लाकडाच्या पेट्या, डबे, मुलांची खेळणी, वगैरे जिनसा करितात. परंतु या झाडाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे या झाडापासून मिळणारा कापुस हा होय. आमच्यापैकी बऱ्याच लोकांना या कापसाचे विशेष महत्त्व वाटत नाही, आणि यामुळेच या झाडाचा बहुतेक कापूस जागच्या जागी झाडाखाली पडुन फुकट जातो. रत्नागिरि जिल्ह्यांत हा कापूस गोळा करून विक्रीकरितां मुंबईस पाठविण्याचा थोड़ा बहुत धंदा चालू असतो. आमच्या देशांत जरी या कापसाचे कापड तयार होत नाही, तरी परदेशांत याच कापसाचे उंची कापड तयार होऊन ते आमच्या देशांत दरसाल हजारों रुपयांचे खपत आहे. याच्या अंगच्या विशेष मऊपणामुळे याला चिकटपणा रहात नाही, आणि म्हणून या कापसाचे स्वतंत्र वस्त्र विणतां येत नाही. परंतु कापसाच्या वस्त्रास रेशमी वस्त्राप्रमाणे तकाकी येण्यासाठी हा सांवरीचा कापूस त्यांत मिसळतात. अशा प्रकारचे तयार झालेले कापड आपल्या इकडे कांहीं जातींच्या हिंदु स्त्रियांच्या अंगावर व नाटकांतून वगैरे दृष्टीस पडते. हें सर्व कापड परदेशांत तयार होत असल्यामुळे, परदेशांतच या कापसाचा खप होतो. सबब धंदा करू इच्छिणारे माणसाने हा सांवरीचा कापूस गोळा करून मुंबईसारख्या ठिकाणी विक्रीकरितां पाठविल्यास पुष्कळ फायदा होईल. गाद्या, गिरद्या, उशा, वगैरे बिछान्याचे व बिछायतीचे सामान भरण्याला हा कापूस