पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      पारिजातक.      १७

-----

रंगविण्याचे कामीं या रंगाचा उपयोग होतो; आरारोट, तांदुळाचे अथवा नाचणीचे पीठ, यांस या रंगाची चार पुटे दिली असतां गुलाल तयार होतो. आरारोट महाग असल्यामुळे, गुलाल करण्यास तांदुळाचे पिठाचा उपयोग करणे हे फायदेशीर आहे. आपल्या इकडे बहुतकरून पतंगाचे रंगापासून गुलाल तयार करितात; सबच गुलाल करण्याच्या कृतीचे सविस्तर विवेचन पुढे ' पतंग' वृक्षाच्या वर्णनाबरोबर केले आहे, ते वाचकांनी अवश्य वाचावे. कांचनाच्या लाकडाच्या काळ्या तयार करण्याचा कारखाना असेल, तर काठ्या तयार करतेवेळी सदर लाकडाच्या ज्या निरुपयोगी ढपल्या पडतील, त्यांचा रंगाचा गुलाल करण्याच्या कामी उपयोग करून घेतल्यास एकांतएक दोन कारखाने सहज चालण्यासारखे आहेत. कांचनाची सालहीं रंगाच्या आणि चामडी कमविण्याच्या कामी येते. कांचनाचे झाडापासून गोंद निघतो, त्यांना 'सेमळा गोंद असे म्हणतात.

--------------------
११ पारिजातक.

 अति पुरातन काळी देव आणि दैत्य या उभयतांनी मिळून समुद्रमंथन केले, तेव्हां त्यांतून लक्ष्मी, कौस्तुभ, आदिकरुन चौदा रत्ने निर्माण झाली. त्यापैकी पारिजातक हे तिसरे रत्न होय; ही पौराणिक कथा वाचकांना माहीत असेलच. अशा ह्या प्राचीनतम आणि पुराणांतरी ज्याची महती वर्णन केली आहे, त्या पारिजातक वृक्षाचे सध्याच्या या औद्योगिक काळांत काय उपयोग होण्यासारखे आहेत, याजबद्दलचा या भागांत विचार करावयाचा आहे. पारिजातकाची पाने खरखरीत असतात, यामुळे पॉलिश करण्यासाठी त्याच्या जून पानांचा उपयोग करतात. पारिजातकाचे पानांचा काढा तापावर गुणकारी आहे. या झाडाची साल कातडी कमाविण्यास उपयोगी पडते. सर्पाचे विषावर व कफविकारावरही या सालीचा उपयोग होतो. पारिजातकास पांढऱ्या रंगाची फुले येतात. या फुलांच्या पाकळ्यांचा जांभळा रंग होतो. पारिजातकाच्या फुलाचे दांडे नारिंगी रंगाचे असतात. या दांड्यांचा, केशरी व नारिंगी रंग करितात. हा रंग तयार करणे अगदी सोपे आहे. पारिजातकाची फुले वेचून आणून त्यांचे दांडे खुडून ते उन्हांत वाळवून ठेवावे, आणि ज्यावेळी रंग करावयाचा असेल, त्या वेळी ते दांडे उकळत्या पाण्यात टाकून थोडावेळ उकळू द्यावे. नंतर फडक्याने गाळून पिळून काढावे म्हणजे रंग तयार झाला. जें रेशीम रंगवावयाचे असेल तें प्रथम पाण्यात भिजवून पिळून काढावे, आणि नंतर ह्या रंगांत बुडवून काढून सावलीत वाळवावे. रंग फिक्का वठल्यास पुन्हा रंगांत भिजवून वाळवावे. हा रंग लवकर उडून जातो, यासाठी फटकी अगर चुन्याचे पाणी