पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
१० कांचन.

 कांचन आणि आपटा ही एकाच वर्गांतली झाडे असून, या दोहोंमध्ये पुष्कळ साम्य आहे. ह्या झाडांची पानें जोड़गीर म्हणजे द्विदल असतात. कांचनाचे पान आपट्याच्या पानासारखेच परंतु त्याहून थोडे मोठे व पातळ असते, कांचनांत, पांढरा तांबडा आणि पिवळा अशा तीन जाती आहेत. या जाति फुलावरून मात्र ओळखल्या जातात. कांचनाची फुले देवास वाहतात, व याच्या कोवळ्या कळ्यांची भाजी होते. कांचनाची साल व फळे औषधी आहेत. तांबडा कांचन गंडमाळा, रक्तपित्त, कुष्ठ व कफ यांचा नाश करणारा आहे. पांढऱ्या कांचनाचा दमा, खोकला वगैरे विकारांवर उपयोग करतात. कांचनादि काढा व कांचनार गुग्गुळ ही औषधे गंडमाळा या विकारांवर अप्रतिम असल्याचे शाङ्गन्धरांत वर्णन आहे.

  कांचनारत्वचः क्वाथः शुंठीचूर्णेन नाशयेत् ।
  गंडमालां तथा क्वाथः क्षौद्रेण वरुणत्वचः ।। १ ।।
      शार्ङ्ग्धर.
 म्हणजे कांचनवृक्षाच्या सालीचा काढा सुंठीचे चूर्ण मिळवून प्राशन केला असतां गंडमाळा दूर होतात. कांचनार गुग्गुळ घेतल्याने तर कसल्याही दुर्धर गंडमाळा असल्या तरी त्या बऱ्या होतात. अशाबद्दल सदर ग्रंथांत बरेच वर्णन आहे. कांचनाचे लाकूड फार् चिवट असते, यामुळे त्या लाकडाच्या हातांत धरण्याच्या काठ्या करितात. या काठ्या वजनदार, मजबूत आणि चिवट असून पॉलिश केल्याने फारच सुरेख होतात. काठ्या वापरण्याची चाल हल्ली किती प्रचारांत आली आहे, हे कोणास सांगावयास पाहिजे असे नाही. तर अशावेळी जेथे कांचनाची झाडे पुष्कळ आहेत, तेथील एखाद्या उद्योगी माणसाने या काठ्या तयार करण्याचा कारखाना सुरू केल्यास बराच फायदा होण्याचा संभव आहे. कांचनाचे लाकुड रंगाच्याही उपयोगी आहे. लाकडापासून रंग काढण्याची कृति खालीलप्रमाणे आहे :-

 कांचनाच्या चांगल्या जुनाट झाडाच्या ढपल्या उखळांत घालून ओबड धोबड कुटाव्या. नंतर त्या कुटलेल्या ढलप्या पातेल्यांत घालून त्यांत पाणी घालावे व चार प्रहरपर्यंत ते पातेलें तसेच राहूं द्यावे. नंतर चुलीवर ठेवून यांतील निम्मे पाणी आटवावे, म्हणजे त्यास साधारण तांबूस रंग येईल. त्या पाण्यांत पापडखार घालून पुन्हा ते पाणी आटवावे आणि आपणास पाहिजे तसा रंग आला म्हणजे पातेलें चुलीवरून खाली उतरावे; कपडे