पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

खूप तुडवितात, ( फुलांतील पिवळा रंग धुपून जाऊन त्यांतून स्वच्छ पाणी निघेतोपर्यंत हे तुडविण्याचे काम करावे लागते. ) हे तुडविण्याचे काम पांच सहा दिवसपर्यंत सतत करावे लागते. प्रत्येक दिवशी धुण्याचे काम आटोपलें म्हणजे रंगाचा गोळा सावलीत सुकवितात. याप्रमाणे सहा दिवस कृति केल्यानंतर त्याचे लहान लहान गोळे, अगर वड्या तयार करून त्या विकावयास पाठवितात. पहिल्या व शेवटच्या बाराच्या फुलांचा रंग चांगला होत नाहीं. मधल्या बारांचा रंग चांगला होतो. फुलें काढून ती तशीच पडू दिली तर लवकरच उबून खराब होतात, व त्यापासून कमी दर्जाचा रंग होतो. तसेच फुले झाडावरही पक्की होईपर्यंत ठेवीत नाहीत. कारण उन्हाने रंग नाहीसा होतो. दर एकरास सरासरी पांच सहा मण फुले निघतात, व त्यापासून दीडमणपर्यत कुसुंबा होतो. कुसुंब्याला दरमणीं पंचवीस रुपयेपर्यंत किंमत पड़ते. गुजराथेंत कुसुंबा चांगला उतरत नाही, यामुळे तेथील कुसुंब्यास दरमणी आठ रुपयेपर्यंत भाव येतो. कुसुंब्यामध्ये लाल व पिवळे अशी दोन रंगीत द्रव्ये असतात. लाल द्रव्यास रासायनिक भाषेत " कार्थेमिन " असे म्हणतात. हे पाण्यांत अविद्राव्य असते व याचाच उपयोग रंगाचे काम होतो. पिवळे द्रव्य विद्राव्य असल्यामळे रंगाच्या कामी त्याचा कांही उपयोग नाही, आणि म्हणूनच पिवळा रंग धुवुन साफ घालवावा लागतो. परदेशांत पाठविण्याकरितां कुसुंब्याच्या वड्या अगर गोळे कसे तयार करतात, याची रीत वर दिली आहे. आता स्थानिक उपयोगाकारितां कुसुंब्याचा रंग कसा करितात, त्याची माहिती सांगून हे प्रकरण पुरे करू. सांगली, मिरज, तासगांव वगैरे ठिकाणी पागोट्यांस चांगले रंग देतात. त्यांपैकी सांगली येथे ज्या रीतीने पागोट्यांना निरनिराळे रंग देतात, त्याची माहिती थोडे वर्षांपूर्वी एका मासिकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तिचाच सारांश येथे देतो.

 सांगली शहरीं पागोट्यांना दहा निरनिराळ्या प्रकारचे रंग देतात. सुमारे चाळीस हात लांब अशा पागोट्यास कुसंबी रंग देणे असेल तर, चार पायाच्या व दोन हात उंचीच्या लांकडी चौकटीला कपडा झोळीसारखा टांगून त्यांत पक्का एक शेर कुसुंब्याची फलें घालतात, व त्यावर घागरभर पाणी ओततात, फुलांतून पाणी खाली गळून फुले भिजली म्हणजे ती हाताने चांगली कुसकरून त्यावर पुन्हा घागरभर पाणी ओततात. म्हणजे तांबूस रंगाचे पाणी खाली पडू लागतें. नंतर फुलांतील पाणी अगदी पिळून टाकून त्याचा कोरडा चोथा करितात. नंतर त्यांत चार तोळे पापडखार मिश्र करून ते मिश्रण झोळीत घालून यात सुमारे अर्धा घागर पाणी ओततात. यावेळी जें लाल रंगाचे पाणी गळतें तो रंग होय. हे पाणी धरून एकीकडे ठेवितात. नंतर झोळींत पुन्हा दोन तांबे पाणी