पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      करडई.      ११

-----
७ करडई.

 कोंकणांत राहणाऱ्या इसमास करडईच्या झाडाबद्ल विशेष माहिती नसेल. कदाचित पुष्कळ इसमांनी हे झाड पाहिलें सुद्धां नसेल. गुजराथेत, देशावर व कर्नाटकांत करडईचे पीक होत असल्यामुळे तिकडे आबालवृद्धांत हें ठाऊक आहे. ही झाडे सुमारे दोन अडीच फूट उंच वाढतात. या झाडाची पाने लांबट असुन त्यांस कातरा असतो. करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी करितात. या झाडास पिवळ्या व नारिंगी रंगाचे फूल येते. त्यांत केशरासारखे तंतु असतात. फुलाच्या मागे बोंड असते, त्यांत करडईचे बी तयार होते. हे करडईचे बी पांढऱ्या रंगाचे असते. ते गुरांस खावयास घालतात व त्याचे तेल काढतात. हे करडईचे तेल खाण्यास व जाळण्यास उपयोगी पडते. करडईची पेंड गुरांस व खतास उपयोगी पडते. करडईच्या पिकाने जमीन लवकर निःसत्त्व होते, यामुळे करडईचे स्वतंत्र शेत बहुधा कोणी करीत नाहीं. जोंधळा, गहुं, वगैरे धान्याबरोबर मोगण करून करडई पेरण्याची पद्धत आहे. करडईच्या झाडाला व बोंडाला कांटे असतात. तेव्हां ही झाडे सभोंवतीं असल्याने गव्हाच्या व जोंधळ्याच्या शेताला जनावरांचा फारसा उपद्रव होत नाही. म्हणून सदर शेतांचे सभोंवतीं करडईच्या स्वतंत्र एक दोन पाभारी पेरण्याची देशावर पद्धत आहे. करडईत बीन काट्याची करडई म्हणूनही एक जात आहे. तिला कुसुंबी असे म्हणतात. करडईची झाडे फुलू लागली म्हणजे फुलांच्या त्या मनोहर रंगामुळे शेतास एकप्रकारची विशेष शोभा येते, व शेताचे कडेने जाणाऱ्या इसमास तो मनोहर देखावा घटकाभर पाहण्याची साहजिक इच्छा उत्पन्न होते. करडईच्या फुलापासून कुसुंबा तयार करतात, व त्याबद्लचीच माहिती या ठिकाणी प्रमुखत्वाने द्यावयाची आहे. करडईच्या झाडाला सुमारे तीन महिन्यांनी फुले येतात, फुलांचा बार आला म्हणजे फुलांच्या पाकळ्या वरून पांच बोटांत धरून काढून घ्याव्या. पाकळ्या काढतांना खालच्या बोंडांस धक्का न लागू देण्याविषयी खबरदारी घेतली पाहिजे. एका बाराची फुले काढल्यानंतर सात आठ दिवसांत दुसरी बार येतो. त्याचीही फुलें याप्रमाणेच काढावी. अशा तऱ्हेने तीन चार बारांची फुले काढून घ्यावी. फुले काढल्याने करडईचे पिकास फारसा धोका येत नाही. फुलें काढल्यानंतर ती एक दिवस उन्हांत व दोन दिवस सावलीत सुकू द्यावी. नंतर उखळांत अगर खलबत्त्यांत घालून चांगली कुटावी, व चाळणीने चाळावी. म्हणजे कच्च्या रंगाची पूड तयार झाली. परदेशात पाठविण्याकरितां रंग करावयाचा असेल, तर फुले सुकविल्यानंतर ती पोत्यात घालून त्यावर पाणी शिंपडून पायांनी