पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.शालोपयोगी भारतवर्ष,
हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास.

 मराठी चवथे इयत्तेपासून म्याट्रिकच्या क्लासापर्यंत विद्यार्थ्यास उपयोगी पडेल, अशी याची रचना केली आहे. सर्व शाळाखात्यांत हल्ली हाच इतिहास चालू माहे. पूर्वीची आवृत्ति सुधारून तीत नवीन उपयुक्त माहिती पुष्कळ घातली आहे. शिवाय प्राचीन व अर्वाचीन हिंदुस्थानचे नकाशे घातले आहेत. हल्ली या पस्तकाची ८वी आवृत्ति विक्रीस तयार आहे. किं, १४ आणे.

--------------------
बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास.

 मराठी दुसरे इयत्तेपासून चवथे इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांस उपयोगी पडेल, असा हा महाराष्ट्र देशाचा इतिहास भरपुर माहितीसह सुलभ भाषेत बडोदे येथील राजपुत्र विद्यालयाचे शिक्षक श्रीयुत गोविंद सखाराम सरदेसाई बी.ए.यांनी तयार केला आहे, व तो शाळाखात्याने पसंत करून वहाडप्रांतांतील शाळांत हल्ली चालू झाला आहे. लहान मुलांस इतिहासाचा बोध चटकन सुलम रीतीने होईल अशा प्रकारे परिशिष्टे, वंशावळी, वगैरे देऊन तो उपयुक्त केला आहे. प्रत्येक शाळामास्तराने या इतिहासाचा उपयोग अवश्य करावा. किं. २ आणे.

--------------------

 ग्रीसदेशचा संक्षिप्त इतिहास.-विद्यार्थ्यांस ग्रीक देशाच्या इतिहासाची अवश्य ती माहिती थोडक्यांत व्हावी, अशा पद्धतीने हा इतिहास विद्यार्थ्यांच्या व सर्वसाधारण लोकांच्या उपयोगाकरितां रा. गोविंद सखाराम सरदेसाई, बी. ए. यांनी तयार केला आहे. किं. ८ आणे.

--------------------

मुहूर्तमाला -- ज्योतीषासंबंधाने जे अनेक संस्कृत ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाधारे हा ग्रंथ आर्यारूपाने मराठीत रा. बाळकृष्ण दत्तात्रय जोशी यांनी तयार केलेला आहे. या पुस्तकांत शुभाशुभप्रकरण, २.--------, ३ संस्कारप्रकरण, ४ घटितप्रकरण, ५ ग्रहप्रकरण, ६ कृषिप्रकरण, ७. -----प्रकरण याप्रमाणे मुख्य सात प्रकरणे घेऊन तत्संबंधी एकंदर

-------- बसावे ह्मणून आर्यारूपाने दिले आहेत. शेवटीं 

परिशिष्टे जोडली आहेत, किंमत ४ आणे,