पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      भेंड.      

-----

फारच सुरेख दिसतात. बेलफळाच्या या डब्यांचा व वाट्यांचा देव्हाऱ्यांत पंचपाळ्या ऐवजी हळद, कुंकु, अबीर, कापूर, गंधगोळ्या, गंधाचे रवे, भस्म वगैरे ठेवण्याचे काम चांगला उपयोग होतो. सदर्हू जिनसा तयार करण्याला खर्चही बेताबातानेच येतो. बेलफळांच्या जिनसांचा अफगाण लोकांत फार खप आहे. पेशावर येथे सदर्हू जिनसांचा मोठा व्यापार चालतो. बेलफळाचे पोटांत जो डिंक असतो, त्यांत चुनां घालुन एकप्रकारचे लुकण तयार करतात, तें चिनीमातीची फुटकी भांडी जडविण्याचे काम येते. बेलफळांचा मुरंबाही करतात.

--------------------
४ भेंड.

 भेंड्याचे झाड दहा फूट पर्यंत उंचं वाढते. त्यात प्रथम पिवळ्या रंगाची फुले येतात; नंतर ती तांबडी होत जातात. या फुलांत एक विशेष गुण आहे, तो असा की, प्रत्येक फुलास फळ धरते. या झाडास वांझ फूल येत नाही. योग्यवेळी पाणी व खत मिळेल तर त्यास फूटभर लांबीचा देखील भेंडा येतो. भेंडा हे फळ स्वच्छ असून पौष्टिक आहे. भेंड्याची भाजी, कचऱ्या, भजी, असे अनेक पदार्थ करितात. भेंडा पौष्टिक असल्यामुळे कित्येक लोक सकाळच्या प्रहरी तो हिरवा सुद्धा खातात.

 अंबाडीप्रमाणे भेंड्याच्या झाडांपासूनही वाख निघतो, ही गोष्ट आमच्या इकडील बऱ्याच लोकांस माहीत आहे, परंतु भेंड्याचा वाख काढून तो उपयोगांत आणल्याचे मात्र फारसे कोठे दिसुन येत नाही. भेंड्याची झाडे सुकण्याचा हंगाम आला म्हणजे ती उपटून त्यांच्या लहान लहान जुड्या बांधाव्या. नंतर त्या जुड्यांचे मोठमोठे भारे बांधून ते भारे चार सहा दिवसपर्यंत पाण्याच्या डोहांत कुजत घालून ठेवावे. पांचवे सहावे दिवशी भारे पाण्यातून काढून त्यांतील जुड्या पाण्यात धुवून साफ कराव्या. नंतर त्यांचे बुडखे थोड़े रुंद करून त्या उभ्या करून ठेवाव्या. थोड्या सुकल्या म्हणजे जुड्या सोडून त्यांतील प्रत्येक झाडाची साल सोलून काढावी. नंतर ते धागे पाण्यांत स्वच्छ धुऊन उन्हांत सुकत टाकावे. सुकले म्हणजे वाख तयार झाला. घागे सोलून काढल्यानंतर ते स्वच्छ धुण्यासंबंधाने विशेष काळजी घ्यावी. म्हणजे वाख पांढरा व तजेलदार होतो. भेंड्यांचा हा वाख अंबाडीच्या वासाइतका मजबूत नसतो, तथापि अंबाडीच्या वाखाप्रमाणेच जनावरांचीं दावी, दोरखंडे, शिंकी वगैरे अनेक प्रकारच्या जिनसा करण्याच्या कामी याचा उपयोग होतो. अंबाडीच्या व भेंड्याच्या वाखांत इतकें सादृश्य असतें कीं, नवख्या माणसाला सहसा हा अंबाडीचा वाख नव्हे असे म्हणता येणार नाही. आमच्या इकडे खेडेगांवां-