पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      बेल.      

-----

सुकू द्यावी. सुकल्यानंतर दांडक्याने त्याच्या शेंगा झोडाव्या, म्हणजे शेंगांतील बीं खाली पडते, ते गोळा करून एक दोन दिवस उन्हात वाळवावे म्हणजे त्याच्या अंगचा दमटपणा जाऊन ते चांगले टिकाऊ बनते. हे बी कॉफीच्या बियाप्रमाणे तुपांत तळून त्याची बारीक भुकटी करावी, व ज्यावेळी कॉफी करावयाची असेल, त्या वेळी सदर्हू भुकटी पाण्यांत चांगली उकळवून त्यांत दूध, साखर, जायफळ वगैरे घालून गाळून घ्यावी. हा टाकळीचा अर्क चवीला कॉफीप्रमाणे असून, फार गुणकारी आहे. अशा तऱ्हेने टाकळीचे बी उपयोगांत आणल्यास फुकट जात असलेली एक वस्तु उपयोगात आणल्यासारखें होऊन, कॉफीस लागणारा खर्च थोड्या तरी प्रमाणानें कमी लागेल, यात शंका नाहीं.. बी काढून घेतल्यानंतर जी झाडांची कोडे राहतात, त्यांचा सरपणाप्रमाणे जळणाच्या कामी उपयोग होतो. तरी धंदा करू इच्छिणाऱ्या माणसाने हा देशी कॉफीचा [ टाकळ्यांच्या बियांचा ] बिन भांडवली धंदा अवश्य करून पहावा, अशी शिफारस आहे.

---------------------
३ बेल.

बेलाचे झाड सर्वांना माहीत आहे. निदान आम्हां हिंदु म्हणविणाऱ्या लोकांना तरी ते पूर्ण माहितीचे आहे. कारण:--

  नित्य बिल्वदळे शिवासि वाहत ।
   त्याएवढा नाहीं पुण्यवंत ।।
  तो तरेल हे नवल नव्हे सत्य ।
  त्याच्या दर्शनें बहुत तरती ।। १ ।।
     शिवलीलामृत अध्याय २ रा.
 अशा तऱ्हेने बिल्वपत्र शंकराला प्रिय असल्यामुळे त्याच्या पूजेला चार दोन तरी बिल्वपत्रे मिळवून ती त्याला अर्पण करण्याचा आमचा नित्य क्रम असतो आणि म्हणूनच बेलाचे झाड परसांत लावण्याचा हिंदुलोकांचा परिपाठ आहे. कांहीं खेडेगांवांतून तर बेलाच्या झाडांचे मोठमोठे बागच आहेत. परंतु बिल्वपत्रे शंकराला वाहण्यापलीकडे त्या झाडांचा दुसरा कांहीं उपयोग होत असल्याचे ऐकिवांत नाहीं.

 बेलाचे झाडाला गुजराथेंत 'बीली' संस्कृतांत ‘बिल्व' आणि हिंदुस्थानीत 'बेला' अशी नावे आहेत. बेलाचे झाडाला त्रिशूलाकार तीन दळाचे पान