पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





व्यापारोपयोगी
वनस्पतिवर्णन.
---------------
१ तुळस.
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद्हं तीर्थभूतं हि नायांति यमकिंकराः ।।
    'पद्मोत्तरखंड.'

 कृष्णप्रिया जी तुळशी तिचें वास्तव्य आम्हां हिंदु म्हणविणाऱ्या प्रत्येक गृहस्थाचे घरी बहुतकरून असावयाचेंच, तुळशीला संस्कृतांत 'वृंदा ' असे नांव आहे, आणि त्या वरूनच ' वृंदावन ' हा शब्द झालेला आहे. कृष्णतुळस, रामतुळस, रानतुळस आणि बाबीतुळस ऊर्फ सबजा, अशा तुळशीच्या चार मुख्य जाति आपल्या इकडे प्रसिद्ध आहेत. याशिवाय ' तुकामिरीयन ' तुळस म्हणून तुळशीची पांचवी एक जात असल्याचे, रा ० रा० श्रीपाद केशव नाईक यांचे गेल्या आगष्ट महिन्यांत आर्यमहिला समाजामध्ये ' तुळस' या विषयावर झालेल्या व्याख्यानाचा जो सारांश वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाला आहे, त्यावरून दिसून येते. हिंदुधर्मशास्त्रदृष्ट्या तुळशीचे महत्त्व किती आहे, हे पद्मोत्तर- खंडांतील जो उतारा शिरोभागी दिला आहे, त्यावरून दिसून येईल, याच अर्थाचे तुलसीमाहात्म्य, नामदेवांनीही आपल्या एका अभंगांत वर्णिले आहे. नामदेव म्हणतात :--
  तुळस असे ज्यांचे द्वारी, लक्ष्मी वसे त्याचे घरीं ।
  येवोनी श्रीहरि, क्रीडा करी स्वानंदें ।।
  तुळसीशी मंजुळ येतां, पळ सुटे यमदूतां ।
  अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां, नासे दुरित चित्ताचें ।।
तसेच पुंडरीक कवि आपल्या तुलसीस्तोत्रांत म्हणतात.---
  तुलस्या नापरं किंचिद्दैैवतं जगतीतले ।।
अशाच प्रकारे आणखीही अनेक कवींनी आपापल्या काव्यांत ‘तुलसीमाहात्म्य' निरनिराळ्या प्रकारांनी वर्णिले आहे. आमच्या हिंदुधर्मशास्त्रात