पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आपल्या कुटुंबाशीच (पत्नी) प्रतारणा करू लागले. 'माता न तू वैरिणी' सारख्या विराणी आळवणाच्या साच्या या दशा माणूस माणसास पारखा झाल्याचेच द्योतक होय.
 जे घरी तेच दारी. कधी काळी गाव जेवण घालणारा माणूस निवडक निमंत्रितांना ‘बुफे'च्या नावे अर्धपोटी ठेवू लागला. हे सर्व कशाचे लक्षण? ही तर शुद्ध प्रतारणा, स्वत:ने स्वत:शी व इतरांशीही केलेली. जगण्याची साधने मर्यादित पण अमर्याद भौतिक सुखाची लालसा, खोट्या प्रतिष्ठा उराशी बाळगून जगण्याचा सोस, रात्रीत कुबेर होण्याची कांक्षा, प्रत्येकात टोचणारे मदनबाण, प्रत्येकाच्या रोमारोमात रंभेचा रोमान्स, घराचे उंबरे गेले त्याच दिवशी सीताहरण सुरू झाले. कैफ केवळ कामाचाच राहिला नाही. मदिरा, मदिराक्षी, पलीकडे जाऊन स्वजातासच गर्भवती करण्याचा नराधमपणा ज्या दिवशी माणसाने केला त्या दिवशीच ‘कुटुंब' नामक संस्था या दुनियेतून विसर्जित झाली.
 १९९४ हे वर्ष व येणारा प्रत्येक वर्षाचा १५ मे हा दिवस आपणास अंतर्मुख करत राहील अशी अपेक्षा आहे. ‘सुबह का भूला शाम को लौट आता है' हे जर खरे असेल तर 'Better the late than never' या न्यायाने आपण परत ‘कुटुंब' आकारूया, हव्यास, हवस यातून मुक्त होऊन. माणसास माणसाची ओढ लागेल तो सुदिन! व्यक्तिवादाच्या नावाखाली आपण समूह व सहजीवन, सहअस्तित्वास पारखे होतो आहोत. ‘कुटुंब वर्ष' हे आपणास पुन्हा एकदा ‘चिरेबंदी वाड्याची' साद घालत आहे. 'मग्न तळ्याकाठीच्या रम्य जीवनाची
 ओढ ते तुमच्या मनात निर्माण करील. माणसाचा ‘युगान्त' होऊ द्यायचा नसेल तर अंगण, परस, चौसोपा, चौफाळा, माजघर, आजोळ, काका, मामा, बारसं, मुंज, साखरपुडा, केळवण, डोहाळे, माहेरपण, सण असे किती तरी शब्द, संज्ञा, संस्कार, संबंध आपण जपायला हवेत. ‘कुटुंब' शब्दाची व्यापकता, त्यातील संबंधाचे गहिरेपण जपण्याची साद घालणारे हे वर्ष आपण आचरू या. स्वत:पासून 'Charity begins at home' च्या न्यायाने. घर, कुटुंब हे केवळ राहण्याचे ठिकाण नसते, तर ते प्रेमाश्रम असते. असते ते संस्कार केंद्र, समाज, राष्ट्र, विश्व निर्मिणारे. त्यातून आकारते वैश्विक कुटुंब. कुटुंब वर्षाची तीच Ulah allah 311€. 'We are one Family.'

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/७0