पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

करणे, व्याख्याने करणे, सहली योजने, आरोग्य शिबिर योजणेने, काही ज्येष्ठ नागरिक संघ तर बुवा, बाबा, बहन यांची शिबिरे ज्येष्ठांना आध्यात्मिक बनवून अधिक निष्क्रिय करताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक संघटनांचे कार्य हक्क जागृती, कर्तव्य, प्रबोधन, सुविधा विकासांचा आग्रह, दबाव गट, राजकीय मत प्रणाली निश्चिती, ज्येष्ठांच्या अनुभव समृद्धीचा समाज हितोपयोगी व विकास कार्यात योगदान, ज्येष्ठांचे वयोगटानुसार उद्देश व कार्य विभाजन अशा पद्धतीचे झाले तर ज्येष्ठ नागरिक संघांना देशाच्या धोरण निश्चितीत महत्त्वाचे स्थान मिळेल व त्याआधारे भविष्यकाळात सुविधा विस्तारांद्वारे ज्येष्ठांचे जीवन समृद्ध व सुखी होऊ शकेल.
 प्रश्न ६ः प्रगत देशातील ज्येष्ठ नागरिकांचे स्थान कसे आहे? या देशातील जनतेचा विशेषत: कुटुंब, समाज, शासन यांचा ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचा दृष्टिकोन कसा आहे?
 उत्तर : प्रगत देशात (युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंड) ज्येष्ठांचे स्थान दयेवर नाही तर घटना, मानव अधिकार व वृद्धांचे विशेष अधिकार यावर ठरते. त्यासाठी त्या देशांचे स्वत:चे असे ज्येष्ठ नागरिक धोरण' असते. या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा योजना, विमा, निवृत्ती/निर्वाह वेतन/ भत्ता असतो. राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात वृद्धांसाठी स्वतंत्र आश्वासने देतात. जे पाळतात त्यांनाच ज्येष्ठ नागरिक पाठिंबा देतात, मतदान करतात, विजयीही करतात. प्रगत देशात संघटित ज्येष्ठ नागरिकच सरकार व धोरण ठरवतात. त्यामुळे कुटुंब, समाज, शासन यांचा ज्येष्ठांबद्दलचा दृष्टिकोन मान्यता देणारा, प्रतिष्ठा संवर्धन करणारा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विचारात घेतला जाणारा घटक म्हणून असतो.
 प्रश्न ७ : ज्येष्ठ नागरिक संघटनांचा, राजकीयदृष्ट्या एक ‘दबाव गट म्हणून उपयोग करता येईल काय?
 उत्तर : होय, पण त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांची बांधणी, घटना, कार्यपद्धती, संघटन हक्क केंद्री व कर्तव्यपरायण असणे काळाची गरज झाली आहे.
 प्रश्न ८ : ‘फेस्कॉम' आणि 'आयस्कॉन' या राष्ट्रीय महासंघांनी राज्यांच्या विद्यमान परिषदेत व केंद्रीत राज्यसभेत ज्येष्ठांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे, ती मागणी कितपत रास्त आहे? ज्येष्ठांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांचा कसा उपयोग करता येईल?
 ‘फेस्कॉम' व 'आयस्कॉन'ची प्रतिनिधी मंडळातील सदस्यत्वाची मागणी

वंचित विकास जग आणि आपण/६३