पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

दोन वाजले असावेत. मला ज्या मार्गाने जायचं होतं. त्या स्टॉपवर माझ्यापूर्वी एक मुलगा येऊन थांबलेला होता. त्याला मी बसबद्दल विचारलं. तसं त्याने आपल्या मनगटावरील घड्याळाची काच उचलली व स्पर्शानं वेळ पाहात मला सांगितलं की, बस येण्यास अजून दहा मिनिटे आहेत. त्याच्या ब्रेल घड्याळावरून मी ताडलं की तो अंध असावा. बाकी त्याचं बोलणं, वागणं सामान्य मुलासारखंच होतं. त्या दहा मिनिटात त्यानं मला कसं जायचं, कुठं उतरायचं, हायवे कसा आहे, स्टॉप कुठला सारं समजावलं. जणू विदेशी असल्यानं मी आंधळा व स्वदेशी असल्यामुळे तो डोळस! तो माझ्यापूर्वी उतरणार होता. बसमध्ये त्याचा तोच चढला. एखाद्या सराईत डोळस माणसासारखा. बस काही अंतर पुढे जाऊन एका चौकात कडेला थांबली. तो उतरला. पाठोपाठ ड्रायव्हरही। वाहनं सुसाट वेगाने जात होती. कारण तो आंतरराष्ट्रीय महामार्ग होता. ड्रायव्हरनं त्याला रस्त्याच्या पलीकडे असलेल्या बस स्टॉपवर सोडलं व परत येऊन त्याने आपली बस सुरू केली. चौकशी केल्यानंतर मला कळलं की या ड्रायव्हरच्या जॉब चार्टमध्ये त्याला पोहोचवणं नमूद होतं. तो शंभर मैलावरून एकटा क्लाससाठी येतो, जातो. त्याला फक्त रस्ता ओलांडणं जमत नाही, तेवढीच मदत तो घेतो. बस ड्रायव्हर्स युनियननं हे काम सामाजिक बांधिलकी म्हणून स्वेच्छा स्वीकारलं आहे. बसचं वेळापत्रक इकडे-तिकडे न करता ड्रायव्हर्स हे काम बेमालूम करतात. ज्या देशात एका मुलाची इतकी काळजी केली जाते, तो परावलंबी कसा राहील?
 जर्मनीत असताना मी एका सामाजिक संस्थेच्या मुख्यालयाच गेलो होतो. तेरे देस होम्स' त्या संस्थेचे नाव. ओसनाब्रुकला त्या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. ती संस्था भारतातील अनेक अनाथ, निराधार, मुले-मुली, महिला इ. च्या संगोपन व पुनर्वसन कार्यास साहाय्य करायची. तिथे मी पाहिलं, त्या कार्यालयातील एक अधिकारी स्त्री अपंग होती. ती व्हीलचेअरशिवाय इकडेतिकडे जाऊ शकत नव्हती. त्या कार्यालयात तिची व्हीलचेअर उचलून वर नेणारा स्वयंचलित जिना पाहून मी थक्कच झालो. हा सारा खर्च, उपद्व्याप । त्या संस्थेने एका कर्मचा-यासाठी केलेला. का तर अपंगाला मिळालेली संधी नाकारायची नाही. युरोपमधील कोणत्याही सार्वजनिक संस्थेत वा ठिकाणी जा, तुम्हास तिथे साच्या अपंग सुविधा दिसणारच. या सुविधांमुळेच येथील अपंग मानसिकदृष्ट्या स्वावलंबी होतात.
 ऑस्ट्रिया हा युरोपातील विकसित परंतु परंपरा जपणारा देश. जुने ते सोने मानत या देशाने मेट्रो आली तर ट्राम, व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालूच ठेवली आहे. ऑस्ट्रियात सहा महिने बर्फ असतो. व्हिक्टोरिया चालत नाही, बंद

वंचित विकास जग आणि आपण/५९