पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

काळात रशियात अन्नधान्याचा तुटवडा होता. असे असताना अनाथ, निराधार बालकांची आबाळ होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. २० जून, १९१९ रोजी तत्कालीन अन्न मंत्री वुल्पसन यांना लेनिनने लिहिलेले पत्र त्याच्या अनाथ बालकांविषयी असलेले असाधारण करुणेचे द्योतक आहे. त्यात त्याने लिहिले होते की, 'क्रिमियात उपलब्ध असतील तेवढे सर्व हवाबंद फळांचे डबे तसेच चीझ वगैरे सर्व वस्तू मुलांना, फक्त लहान मुलांना आणि विशेषत: त्यातील आजारी मुलांना देण्यात यावेत', पुढे १९२० च्या सुमारास या बालकांना निवा-याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनाथाश्रम, बालसुधारगृहे सुरू करण्यासाठी पेत्रोग्राद शहराबाहेरील सर्व धर्मस्थळे ताब्यात घेण्यात आली. या काळात अनाथ, निराधार झालेल्या बालकांची संख्या सत्तर लाखांच्या घरात होती.
 ऑक्टोबर क्रांतीनंतर रशियात बालकल्याण व सुधार कार्यक्रमास सुसंघटित चळवळीचे रूप आले. या कार्यास चळवळीचे रूप देण्याचे सर्व श्रेय फेलिक्स दूझझिंन्स्की यांना द्यावे लागेल. “क्रांतीची फळे आपल्यासाठी नसून ती मुलांसाठी आहेत. युद्धात अपंग नि अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीला आपण धावून गेले पाहिजे. अगदी बुडणा-याला वाचवायला जातो तसे.'ही भावना रशियन जनतेत रुजविली ती दूझर्शिन्स्कींनी. “या बालकांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यास भरपूर कार्यक्षमता, तत्परता हवी, ताकदही,असे त्यांचे मत होते. प्रतिक्रांती समूळ नष्ट करण्याचे प्रभावी साधन म्हणजे बालकांविषयीची आस्था. तिची उपेक्षा करून चालणार नाही, हे ओळखून या बालक आयोगाने कार्याची आखणी केली. या आयोगाने १९२० साली ३ लाख बालकांचे स्थलांतर करून संगोपन केले. पैकी ६० पालकांना तर साक्षात मृत्यूच्या जबड्यातून मुक्त करण्यात आले. ५0 लाख बालकांना पोषक आहार व कपडे पुरविण्यात आले. दीड लाख बालकांची उपासमारीपासून सुटका केली. लाल फौज, ट्रेड युनियन्स, शेतकरी संघटनांनीही या कामात वेगळा हातभार लावला.
 नंतरच्या काळात १० ते १९ वयोगटातील किशोरांसाठी व्यवसायप्रधान संस्था सुरू करण्यात आली. या वेळी रशियन समाजाची अशी धारणा होती की, “आम्ही लढतोय आणि हालअपेष्टा भोगतोय ते आमच्या सुखासाठी नसून लहान मुलांसाठी, नव्या पिढीच्या सुखासाठी भोगतोय. या पिढीत मनाने आणि शरीराने सुदृढ व शूर मुले निर्माण होऊ देत. आपली निष्ठा विकण्याची पाळी त्यांच्यावर कधीही येऊ नये. आमच्यापेक्षाही ते सुखी होवोत. त्यांच्या

वंचित विकास जग आणि आपण/१०८