पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

く8 लो० टिळकांचे केसरींतील लेख

    • न हि सिंहो गजास्कंदी भयाद्गिरिगुहाशयः' या न्यायानें परपक्षसमाधानार्थ हो इंग्रजी तटबंदी मधून मधून आम्हास करावी लागते. स्रीजातीच्या कर्तव्याबद्दल आमच्या मतात व एडिनबर्ग रिहृयूनामक प्रसिद्ध त्रैमासिक पुस्तकांत नुकत्याच आलेल्या निबंधातील मतात किती सादृश्य आहे हें मार्गे दास्वविलेच आहे. आज नाइंटीन्थ सेचरीनामक पुस्तकाच्या फेब्रुअरी महिन्याच्या अंकांत याच विषयावर एक निबंध आला आहे त्यांतील कांही भागाचा आशय खालीं देतीं.

सदर निबंध मिस सिव्हले नामक एका बाईनेंच लिहिला आहे व त्यातील प्रतिवाद्य विषय इंग्लंडातील मुलीच्या शाळांतून हल्लीं सुरूं असलेली घोकंपट्टी होय. ह्या निबंधांतील बराच भाग मुलाच्या शिक्षणक्रमास लागूं पडण्यासारखा आहे. पण त्याचा येथे विचार न करितां फक्त स्त्रियांच्या शाळांबद्दल व शिक्षणक्रमाबद्दल बाईंचे काय म्हणणें आहे तें पाहूं. आम्ही लिहिल्याप्रमाणेच या बाईंनें प्रथमतः असें प्रतिपादन केले आहे कीं स्त्रियांस व पुरुषांस संसारात निरनिराळीं कामे असतात: करितां दोहोंचा शिक्षणक्रमही स्वभावत: भिन्न असला पाहिजे. तिच्या म्हणण्याप्रमाणेच इंग्लंडांतील शाळांतून जितका पाळला जावा तितका जात नाहीं; व १८ वर्षेपर्यंत मुलींस व मुलास एक प्रकारचे शिक्षण मिळतें. इंग्लंडातील विद्वान पुरुषाच्या मनांत हा भद न उतरल्यामुळे किंवा त्यांचीं मर्ते निराळीं असल्यामुळे ही स्वभावविरुद्ध स्थिति हल्ली प्रचारात आहे. पण निबंधकत्रींचे असें मत आहे कीं, हा भद लक्षात आणता ठरलेले स्रीशिक्षणक्रम सर्व फुकट आहेत व तें कधीही चिरस्थायी व्हावयाचे नाहीत. स्त्रीपुरुषाच्या आयुष्यक्रमामधील भद या निबंधांत खाली लिहिल्याप्रमाणे दर्शविला आहे. “अगदी लहानपणी मुलामुलात काही भेद नजरेस येत नाहीं.पण ती जरा मोठीं झाली कीं,लगेच त्यामधील अतर दृष्टीस पडते. मुलगा दांड, धीट,व गडबड्या होतो व त्यास घराबाहेर पडण्याची मोठी होस असते. मुलगी स्वभावत:च गरीब असते, व तिचे मत हळुहळू भातकुल्या वगैरे घरातल्या खेळाकडे जाऊं लागतें. पुढे जसजशी जास्त वर्षे होतात त्यामानानें हाच भद बळावत जातो, व अखेरीस दोहींच्या दिशा अगदीं भिन्न होतात, व दिशा भिन्न झाल्या म्हणजे अर्थातच कार्याचाही भद झालाच म्हणावयाचा. मुलगा मोठा झाल्याबरोबर तो आपला रोजगारधंदा करण्यास कोठे तरी बाहेर जाते, व मुलगी मोठी झाला-मग ती विवाहित असो वा अविवाहित असेो-तिच्या गळ्यांत घरचा संसार पडतो. पुरुष ज्याप्रमाणे चाकरी किंवा धंदा करतो त्याचप्रमाणे स्रियांसही गृहकृत्ये, मुलाचे शिक्षण, संरक्षण वगैरे केलेंच पाहिजे. येवढयावरून स्त्रियांनीं पुरुषाच्या ताब्यांत रहावे असे होत नाहीं. तथापि ज्याअर्थी पुरुषाची व स्त्रियाचीं कर्तव्यें या जगांत भिन्न भिन्न आहेत त्याअर्थी प्रत्येकानें दुस-याच्या कामांत पडण्यांत कांहीं हशील नाहीं. पुरुषास या लोकीं कोणता अर्थ साध्य आहे, त्यांच्या मनाची प्रकृति कशी असते व ते कशाकरिता झटत असतात वगैरे गोष्टींची माहिती स्त्रियांस असल्याखेरीज