पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्रीशिक्षणाची दिशा. < & स्त्रीशिक्षणाची दिशा* दोन तीन महिन्यामार्गे या विषयावर आम्हीं पाच सात लेख लिहिले होते त्यावरून या विषयासंबंधानें आमची मर्ते वाचकास कळलींच असतील. प्रस्तुतच्या स्रीशिक्षणक्रमाच्या पुरस्कत्र्याइतकेंच किंबहुना ज्यास्तही स्रीशिक्षणाचे आम्ही कैवारी आहों व स्रीशिक्षणाकडे आमच्या मनाची जात्याच प्रवृत्ति आहे.तथापि हल्लीचा शिक्षणक्रम आम्हांस बिलकूल पसंत नसल्यामुळ आमच्यावर प्रतिपक्षीयानी बरीच उचल करून आम्हांस विनाकारण युद्धास प्रवृत्त केले. आमचा मुद्दा इतकाच होता कीं, ज्याअर्थी पुरुषांप्रमाणें स्त्रियांसही ससारात ईश्वरार्ने काही कर्तव्यें अवश्य लावून दिली आहेत, त्या अर्थी पुरुष व स्त्रिया याचा शिक्षणक्रम भिन्नभिन्नच असला पाहिजे. पुरुषांचा धंदा करूं इच्छिणा-या स्त्रियाची संख्या नेहमींच अत्यंत अल्प असणार. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाया लोकानी केवळ या अत्यत अल्प वर्गाच्या सोयीकडच लक्ष देऊन उपयेोगी नाही. केोणतेही राष्ट्र घेतले तरी स्त्रियाचा आयुष्यक्रम पुरुषाच्या आयुष्यक्रमाहून भिन्न अहेि व हा भद आमच्या देशात तर विशेषच नजरस येतो. इतउत्तर शिक्षणाने किंवा एकंदर सुधारणेच्या योगानें हा भद अगदीं कमी केव्हा होईल तो होवेा; पण हल्लीच्या स्थितीचा विचार करितां, सामान्यतः मध्यम प्रतीच्या हिदु स्रियास जगात ज्या स्थितीत रहावे लागतें त्या स्थितीस अनुकूल असेंच शिक्षण त्यास दिले पाहिजे. ह्या दृष्टीने पाहिले म्हणजे विवाहितावस्था व गृहकृत्यें हीं स्त्रियाची दोन प्रधान कर्तव्यें असल्यामुळे स्त्रियाच्या व पुरुषाच्या शिक्षणाची दिशा लवकर भिन्नभिन्न करावी लागणार. साधारण लेखन व वाचन दोघासही एकन इयतेत दिल्यास हरकत नाहीं. पण पुरुषाप्रमाणें स्त्रियास १५ १६ वर्षेपर्यंत घोकपट्टी करण्यास लावणें अत्यंत आहितकारक व स्वभावविरुद्ध आहे. येथील स्त्रिहायस्कुलाच्या शिक्षण क्रमाचे परीक्षण करतेवळीही आमचा मुख्य मुद्दा हाच होता. आमचा सिद्धात चुकीचा असेल; पण जेोपर्यंत त्यांतील चूक कोणीही दाखविली नाहीं तोपर्यंत त्या सिद्धातास हा शिक्षणक्रम कितपत जुळती इतकेंच आमचे पाहाणे आहे. अस्तु. या वादाचा आज येथे उपन्यास करण्याचे कारण इतर्कच की, आमचा हा सिद्धांत कोत्या दृष्टीचा व आमच्या इंग्रजी विद्वतेस न शेोभणारा आहे असा जो एक आक्षेप त्यावळीं आमच्या प्रतिपक्षीयानीं आमच्यावर केला त्याच्या निरसनार्थ आज येथे दुस-या एका प्रसिद्ध इंग्रजी मासिक पुस्तकातील उतारा वाचकास सादर करावयाचा आहे. दुसरा म्हणायचे कारण एक मार्गेच वादप्रसंगी पुढे केला होता. वस्तुत: पाहृतां आमच्या विचारसरणीत काही दोष न दाखविता फक्त * हे करणें तुमच्या इंग्रजी विद्येस शेोभत नाहीं ’ असा साधारण आक्षेप करण्यात कांहीं हांशील नाहीं, व त्यास उत्तर देण्याचीही विशेष आवश्यकता नाहीं. तथापि

  • (६ मार्च १८८८.)