पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

くス लो० टिळकांचे केसरींतील लेख अंतव्र्ययस्था काय आहे ती अद्याप बाहेर आली नाहीं; तथापि ती कशीही असली तरी बोर्डिगाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्यास एक तर सुधारणामहातत्त्वांनीं गुंगवून सद्यःस्थितीस अंध करून सेोडिलें असावे, किंवा पंडिता रमाबाई ज्याप्रमाणे येथे येऊन एक विधवागृह स्थापन करणार आहेत त्याप्रमाणेच या बोर्डिगाचा कांहीं अंशी उपयोग झाल्यास करावा असा त्यांचा हेतु असावा. एरव्हीं आपल्या समाजाची ज्यास यत्किचित् ओळख आहे त्याच्या हातून समजून उमजून परगांवचे लोक आपल्या विवाहित १४।१५ वर्षाच्या मुली या बोर्डिगांत विद्याभ्यासाकरिता पाठवितील असें मानण्याचे धाष्टयै झालें नसतें. असो; पण सर्वत्र प्रकार जेथे याच मासल्याचे आहेत, तेथे एका बोर्डिगाकरिताच आम्ही विशेषवादविवाद करीत नाही. आमचे म्हणणे इतकेंच आहे की सध्याच्या समाजस्थितीचा विचार करिता पुण्यातील फीमेल हायस्कूल किंवा त्याचे बोर्डिगापासून आम्हास काही फायदा नाही. ज्याप्रमाणे प्रार्थनासमाजानें धर्मसुधारणा झाली नाही, त्याचप्रमाणे या हायस्कुलानेही स्रीशिक्षणाच्या कामी काही व्हावयाचे नाहीं. धर्म सुधारण्याकरिता ज्याप्रमाणे लोकात मिसळून त्यास उपदेश करून आपल्याबरोबर ओढिले पाहिजे, त्याप्रमाचेच स्त्रीशिक्षणाची गोष्ट होय. फीमेल हायस्कुलातून जरी एखादी स्त्री एम. डी. किंवा एम्. ए. झाली तरी त्यामुळे आमच्या सामजातील एकंदर स्त्रीसमुहाची सुधारणा व्हावयाची नाहीं. करिता एकंदर स्त्रीसमूहास ससारोपयोगी शिक्षण देण्याची व्यवस्था जर फीमेल हायस्कुलाकडून ह्येणार नार्हो तर ते असून नसून सारखेच. 'मेिल ह्ायस्कुलावर प्रतिवर्पीं हृजारॊ रुपये जे खर्च होतात ते केवळ दहापाच लोकासाठीच आहेत असा आमचा समज नाही व सरकारचाही असेल असे आम्हास वाटत नाही. येवढयावरून आम्ही ज्या थोड्या लोकास या स्कुलाचा फायदा मिळतो त्यांचा हेवा करिती असे कोणीं समजूं नये. साधारण लोकाची प्रथमत: सोय होऊन जर श्रीमंत लोकांची सोय होत असेल तर ती सरकारने खुशाल करावी; पण दोहोंस जर पैसे नसतील तर आधी बहुसमाजसुधारणेकडे पैसे खर्च केले पाहिजेत. आमच्या सुधारकभक्तांप्रमाणे आम्ही आमचे विचार चुकले नसतील असें म्हणत नाहीं, तथापि आमच्या म्हणण्याची चूक न दाखविता जर् दुराग्रहानें, अभिमानानें व शहाणपणाच्या घमेंडीनें आमच्यावर दांभिकत्वाचा आरोप केोणी आणू पाहील, तर लोकांच्यापुढे त्यांच्या मेदूचे वजन आम्हास अवश्य करावे लागेल.