पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फीमेल-हायस्कुलांतील शिक्षणक्रम. と8 झाल्या म्हणजेच आपली सुधारणा होण्यास आपणांस त्यांपासून साहाय्य होणार, ** स्री सुधारणा ?’ व ** स्रीशिक्षण ” यांच्या महातत्त्वांचा उच्चैर्घोष करणारांनी ही गोष्ट अवश्य ध्यानांत ठेविली पाहिजे, की, जोपर्यंत विवाहित स्त्रियाच्या समुदायास सुशिक्षित करण्याचा प्रयत्न चालू नाही तोपर्यंत खया स्त्रीशिक्षणास आमच्याकडे सुरवात झाली असें कधीही म्हणतां येणार नाहीं. प्रायमरी शिक्षणाच्या पुढील शिक्षण हायस्कुलातील होय. पण तें काणाकरिता तर मुलाकरिता. संसारात पडणाया स्त्रियांस त्यापेक्षां निराळ्याच तञ्हेचे शिक्षण पाहिजे व ते ज्या स्कुलांत मिळत नाहीं त्याचा स्रीशिक्षणाचे कामीं कधीही उपयेोग होणार नाही. फीमेल हायस्कुलाच्या उत्पादकास या गोष्टी न कळण्याजोग्या आहेत असें नाही. तथापि कशानेंही म्हणा, त्याची दृष्टि इकडे मुळीच जात नाही. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम विवाहित स्त्रियावर सीईवार नव्हता याची प्रतीति म्यानेजरास लवकरच आली. पण मौज अशी की, त्याचीं खरी कारणे शेोधून काढण्याचा प्रयत्न न करितां हायस्कुलातील मुलींची संख्या प्रायमरी स्कूल हायस्कुलात सामील करून त्यानीं ताबडतोब भरून काढिली. इतकेच नव्हे तर, ज्या दिशेने ते जात होते ती दिशा चुकली आहे अशी हायस्कुलातील विवाहित मुलीची संख्याच साक्ष देत असतां त्या स्कुलाचे व्यवस्थापक अधिकाधिकच त्या दिशेकडे जाऊ लागले. आमच्या येथील मुलांच्या शाळातूनही अजून बोर्डिंगाची नीट व्यवस्था नाही, पण त्या कामीं अगदीं तयारी आहे. ज्या कोणास आपल्या मुली किंवा सुना फीमेल हायस्कुलात ठेवणें आहेत, पण त्याची पुण्यात सोय नाही, त्यानी खुशाल त्यास या बोर्डिगात धाडावें. तेथे त्यांची नीट व्यवस्था राहून त्याच्या हातून इंग्रजी अभ्यास करविला जाईल. फीमेल हायस्कुलाचे उत्पादक हो, आपल्या चातुर्याची या कामीं तारीफ करावी तेवढी थोडीच. मुलाच्या शाळीसही आपण खाली पाहावयास लाविलंत यांत अगदीं शंका नाही. परंतु प्रश्न इतकाच कीं, या आपल्या बोर्डिगांत केोणत्या प्रतीच्या स्त्रिया आहेत किंवा येतील याचा तुम्ही नोट विचार केला आहे काय ? परगावच्या १४।१५ वर्षाच्या संभावित गृहस्थाच्या मुली आपल्या बोर्डिगांत किती आहेत याची माहिती आपण द्याल काय ? मुलाप्रमाणें मुलींसही हायस्कूल झालें; बोर्डिग राहिलें होतें तेवढेही झालें, इतकंच जर आपलें कर्तव्य तुम्ही समजत असाल तर त्यास आमचे काहीं म्हणणे नाही. बाकी विवाहित मुलींस मुलाप्रमाणें स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी लोक आपल्या मुली या बोर्डिगात पाठवितील ही गोष्ट आम्हांस तर आज संभवनीय दिसत नाहीं. मास्तर णीचा धंदा करून उदरनिर्वाह करूं इच्छिणाच्या काही गरीब व अनाथ स्त्रियाखेरीज या बोर्डिगात कोण येणार ? ज्याप्रमाणें फीमेल हायस्कूल हे फक्त काहीं श्रीमंत व अनाथ स्त्रियांच्याच उपयोगी, त्याप्रमाणे ह्या बोडिंगाचाही अनाथ स्रीगृहापेक्षाँ जास्त कांहीं उपयोग होणार आहेसें आम्हास वाटत नाहीं. बोडिंगांतील & o