फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम. ওৎ, योगी आहे. एवंच या शिक्षणक्रमांत जर कांहीं फरक न होईल तर इतके पैसे प्रतिवर्षी पाण्यांत टाकल्याप्रमाणें होणार आहेत. --ബ്-ബജ फीमेल हायस्कुलांतील शिक्षणक्रम.* ( नंबर ४ ) आजपर्यंत आम्ही यासंबंधानें जे लेख लिहिले त्यावरून स्त्रीशिक्षणाच्या संबंधानें आमचा व स्त्रीहायस्कुलाच्या उत्पादकाचा कोठे मतभेद आहे हें वाचकाच्या लक्षात आलेच असेल. तथापि या स्रीहायस्कुलाच्या काहीं भक्तमेडळींनी आमचे प्रतिपादन दांभिक आहे असा आमच्यावर आरोप आणण्याचा प्रयत्न चालविला आहे; करिता त्यासंबधानें आज येथे थेोडासा विचार करूं. फीमेल हायस्कुलातील सद्यःशिक्षणक्रमाचे भक्त हो ! तुम्हास जर असें भासत असेल कीं पाश्चात्य विद्येच्या परिशीलनानें सुधारणेच्या अत्युच्च कल्पना तुमच्याच मात्र मेदंत कॉदल्या गेल्या आहेत व युष्मद्यतिरिक्तजनांनी तुमच्यापुढे आपल्या विचाराची रिपरिप न लाविता मुकाट्यान तुम्ही म् ६णतां त्यासच मान डीलवावी, नाहींतर आपल्या विद्येचा राजीनामा द्यावा,-तर तुम्हास आमचे इतकेंच सागणें आहे की तुम्ही ज्या कालामध्यें पाश्चात् विद्येचे अध्ययन केलें तो काल व आजचा काल अगदी भिन्न आहेत. पाश्चात् विद्येच्या जास्त प्रसाराने म्हणा किंवा तुम्हीं जीं काम गेल्या पाचपंचवीस वर्षात हाती घेतलींत व त्यांत तुम्हास जें यश प्राप्त झाले व तुमचा जेो दृढनिश्चय लोकाच्या नजरेस आला त्यामुळे म्हणा, सुधारणेचे अत्युज्ज्वल स्वरूप जरी तुम्हाआम्हास एकच दिसत आहे, तरी प्रस्तुत कालीं आमचे कर्तव्य काय यासंबधाने तुमचा आमचा बहुधा अपरिहार्य मतभेद आहे. संसाररूप शकटाची गति स्री व पुरुष या दोन चक्राच्या अाधीन आहे व त्यातील एक चक्र मागे पडले तर तो शकट खडुयात पडेल; स्त्री ही पुरुषाची सहधर्मचारिणी आहे; करिता तिच्या साहाय्यावाचून पुरुष एकटाच जर पुढे जाऊं म्हणेल तर तें कधीही शक्य होणार नाहीं; शिक्षणाने ज्याप्रमाणे पुरुष बिघडले नाहींत त्याचप्रमाणे स्रियाही बिघडण्याचा संभव नाही; इ. इ. तुमच्यामतें तुमचीं अनन्योपभोग्य सुधारणेचीं उच्चातिउच्च जीं तत्त्वें आहेत त्याचा प्रत्येक वेळी जप करून काहीं उपयेोग नाही. या तत्त्वानीं तुमची डोकी इतर्कों फिरून गेली आहेत की प्रस्तुत आपणास काय कर्तव्य आहे याची कल्पनाही तुमच्या डोक्यात शिरत नाही.एकानें सुधारणेच्या तत्त्वाचे ढोलकें पिटार्वे व त्याच्या भक्त मंडळीनें त्याच्या भोवतीं वेङयाविद्या उडया मारून “अहोरूपमहीध्वनिः” असा एकच कल्दीळ करावा, याच्यापलीकडे अद्याप तुमची गति झाली नाहीं व सुधारणा
- (ता. २५ आक्टोबर, १८८७)