Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(R) त्यांना प्राप्त झाले होतें तरी अशा विषयांतहि तात्त्विक चर्चा म्हणून जेथे जेथे उद्भवली तेथे तेथेंहि टिळकांचे उपरिनिर्दिष्ट गुण प्रस्तुत खंडातील लेखांतून प्रगट झाले आहेत. पूर्वीच्या तीनहि खेडातील लेखांहून प्रस्तुतच्या खेडातील लेखां. चे वैशिष्टय व अपूर्वत्व कोणासहि दिसून येईल. आणि टिळक व राजकारण यांची अखंड संबंध मराठी वाचकानी मनांत जोडून ठेविलेला असल्यामुळे, त्यानीं पूर्वी विशेष लक्षपूर्वक न वाचलेले किंवा टिळकाच्या राजकीय चळवळीच्या झपाट्यात विसरून गेलेले हे लेख मराठी वाचकान आता मोठे कौतुकास्पद वाटतील यात शंका नाहीं. ते वाचणाराना सामाजिक, धार्मिक विषयाच्या चर्चेत टिळकाची समाजरचनाविषयक तत्त्वे व धोरणे काय होतीं हेहि कळून येण्यासारखें आहे. प्रस्तुत खेडातील लेख कसरीच्या फाईलांतून शोधून निवडून काढण, छाप खान्याकरिता त्याची प्रत तयार करविणे वगैरे बाबतीत चि, काशिनाथ नरसिंह केळकर, वाङ्मयविशारद, टिळक विद्यापीठ व चि. महादेव धेौडी विद्वास एम्. ए एल एल. बी. वकील पुणें याची सवांशीं मदत झाली; व हें काम त्यानीं निरपेक्ष् बुद्धीनें, केसरी-मराठा संस्थेच्या अभिमानाने केलें, याबद्दल आग्ही त्याचे आभारी आद्देौं. न. चिं. केळकर. धों. वा. विद्वांस ट्रस्टी केसरी व मराठा.