Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

V8 3 लो० टिळकांचे केसरीतील लेख जर तें कुटुंब गरीब असेल, तर तसे करणे त्यांस किंबहुना जरूरही पडतें. अशा समाजस्थितींत स्त्रियांस ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे, तिचा आमच्याकडे काय उपयोग होणार ? आमच्या मुलींचीं लझें निदान ऋतु प्राप्त होण्यापूर्वी तरी झालींच पाहिजेत व लग्न झाल्याबरोबर त्यास पतिगृहीं जावेच लागणार. सारांश, अमेरिकेतील मुलींप्रमाणें पितृगृही काम नाहीं व पतिगृह प्राप्त झालें नाहीं, अशी त्याची कधींच स्थिति नसते. तेव्हा आमच्या स्त्रियांस जें शिक्षण द्यावयाचे तें स्वतंत्र धंदा करितां यावा म्हणून नव्हे; तर संसारांत जी त्याचीं कर्तव्ये आहेत तींच त्यास चागलीं करिता यावी, यासाठीं द्यावयाचे. ज्या शाळेत हें शिक्षण मिळत नाहीं तिचा आम्हास काहीं उपयेोग नाहीं व तिची भरभराट कधीं व्हावयाची नाही. कित्येक लोकाचे असें मत आहे कीं, ज्याप्रमाणें इंग्रजी विद्येच्या संस्काराने आपण आपल्या जुन्या रीतीभातींवर पाणी सोडण्यास तयार झाली आहेो, त्याप्रमाणेंच जर स्रियास शिक्षण दिलें तर मग साहेब आणि मडम दोघेही बूटस्टॉकिंग चढवून बंडगार्डनची हवा खाण्यास जाण्यास तयार होतील ! पण हा समज अगदी चुकीचा आहे. हल्लीं इंग्रजी विद्येनें पुरुषाच्या मनावर जे परिणाम होत आहेत व अनावर वर्तन करण्याची जी इच्छा कित्येकात उत्कट झाली आहे, तीच कितपत स्पृहणीय आहे याचा वाद आहे. तर, जें शिक्षण पुरुषासही सर्वांशी हितकारक आहे कीं नाही याचा संशय आहे, तेच स्रियास दिले असता त्याचा परिणाम दुप्पट अहितकारक होईल यांत शका कोणती ? ज्या इंग्लडदेशाचे आपण अनुकरण करण्यास इच्छितों, तेथेही स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण गेल्या पाचपंचवीस वर्षातच देऊं लागले आहेत. मग त्याची आमच्याकडेच एवढी घाई कां ? आपले विवाह प्रेोढपणीं होऊं लागले, आपली आविभक्त कुटुंबावस्था मोडून गेली, आपलीं धर्म व नीति यांचीं जुनीं बंधनें शिथिल झालीं, व आपल्याकडील मध्यमस्थितींतील गृहस्थलोक दोन पैसे संग्रही राखून राहूं लागले म्हणजे तुमच्या इंग्रजी शिकलेल्या, पियानोवर सुस्वर गाणाया, व किंडर गार्टन डान्स नाचणीच्या व सीता, अहिल्याबाई याच्या ऐवजीं ग्रेस डालिंग व इलिझाबेथ याच्या गोष्टी सागणाच्या स्त्रिहायस्कुलांतून निघालेल्या मुलींस किंमत येईल. ज्यांस आपल्या धर्माचा व गृह्कृत्याचा कंटाळा आला नाहीं अशाच, पण थोडेसें लिहितां वाचता येणा-या, स्त्रिया आजमित्तास पाहिजे आहेत व ज्या स्कुलाच्या शिक्षणार्ने एतद्विरुद्ध परिणाम होतात त्याची आम्हास जरूर नाही. सासरी किंवा माहेरीं रोजचे थोडेंबहुत घरचे काम करून मधल्या वेळात दोन तीन तास स्रीधर्मास व हिंदुधर्मास उचित असे स्त्रियास शिक्षण देण्याचे जर कोणी मनांत आणिलें तर ती गोष्ट साध्य आहे. पण जेथे सर्व धर्माच्या मुली एकत्र करून त्यांस पुरुषांप्रमाणें ११ ते ५ वाजेपर्यंत इंग्रजी बाई आग्लभैौम शिक्षण देणार, ती शाळा एक अतिश्रीमंतांच्या किंवा अनाथ झाल्यामुळे कांही तरी धंदा करण्याची ज्यांस जरूर आली