रावबहादुर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य स्पष्ट सांगितले आहे. पण तेंही बिचारें रा. ब.च्या समोर येऊन उर्भे राहिलें नाहीं. निजलेल्यास कोणी जार्गे करील पण जाग्यास जार्गे कोण करणार ? तेव्हां रा.ब. स सोडून वाचकांच्या समाधानाकरिता मर्नूत वाक्यपारुष्यप्रकरणीं अशाच तन्हेनें पितापुत्र, गुरुशिष्य, पतिपत्नी यांचे संबंधात दंड सांगितला आहे तो येथे देतों: मातरं पितरं जाया भ्रातरं तनयं गुरुं अाक्षारयत्शतं दाप्यः पंथानं चाददद्गुरोः । * आक्षारयन् ’ याचा कुल्लूकानीं ** दुभीषण-शिविगाळ करणारा ” असा अर्थ केला आहे. याही वचनाचा व अर्वाचीन सुधारलेल्या राष्ट्रांतील धनीचाकर, पतिपत्नी वगैरे संबंधांच्या कायद्यांचा मिळून सर्वोचा एकदमच अर्थवाद करावा असें जर रा. ब. म्हणत असतील तर त्याच्या विद्वतेस धन्य मानिले पाहिजे. दुसरे काय? आतां राहतां राहता एक मुद्दा राहिला. तो असा कीं पतीचा त्याग कर णा-या स्रोस दंड आहे, पण कैदची शिक्षा कोठे आहे ? आहे; जरा दम धरा. आधीं हल्लींच्या कायद्यांत कैदेची शिक्षा केव्हां आहे ती पाहूं. हल्ली असा कायदा आहे कीं नवराबायकोची फिर्याद कोर्टापुढे आली म्हणजे प्रथम योग्य कारणावांचून पतीचा त्याग केला असल्यास स्रीस पतीकडे जाण्यास कोर्टानें सागावे. हा कोर्टाचा हुकूम स्री अमान्य करील तर तीस कैदैत टाकावी. कैदची शिक्षा प्रथम नाहीं. हिंदुधर्मशास्रांतही असेंच सागितले आहे. राजानें वादीप्रतिवादी आपणापुढे आले म्हणजे प्रथमतः कोर्टाचा हुकूम ते मान्य करतील याबद्दल त्याजकडून जामीन ध्यावा: उभयोः प्रतिभूर्गाह्यः समथैः कार्यनिर्णये । असें याज्ञवल्क्यांनी सागितले आहे. असा जामीन त्यानीं न दिल्यास विज्ञानेश्वर म्हणतात:
- तस्यासेभवॆऽर्थेिप्रत्यर्थिने रक्षणे पुरुषाः नियेोक्तव्या: तेभ्यश्च ताभ्या प्रतिदिनं वेतनं देयं तथाह् कात्यायनः । अथ चेत्प्रतिभूर्नास्ति कार्ययोग्यस्तु वादिनः संरक्षितो दिनस्यांते दद्यात् भृत्याय वेतनमिति । म्हणजे त्यांस तेव्हांपासूनच कैदेंत टाकावें. तात्पर्य; हल्लीपेक्षांही जुनें धर्मशास्त्र कडक होतें. हल्लीं हो फिर्याद दिवाणी आहे; पूर्वी फौजदारी होती. कोर्टाचा हुकूम अमान्य केल्यास हल्लीं कैद आहे; पूर्वी प्रथमच जामीन घेत असत. व तो न दिल्यास तेव्हांपासूनच कैदेंत टाकीत. उघडच आहे. राजाकडे जायाचे तर तो सांगेल तें न ऐकल्यास दंड पाहिजेच. एन्हवी कोटीचा किंवा राजाचा हुकूम मानतो कोण ? मनूनें म्हटले आहे:
वाग्दंडं प्रथमं कुर्याद्धिग्दंडं तदनंतरं तृतीयं धनदंडं तु वघदेडमत:परं ।