Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ लो० टिळकांचे केसरीतील लेख पतित, वेडा किंवा महारोगी असेल तर मात्र या चार कारणाकरिता स्त्रीनें त्याचा त्याग केल्यास ती दोषार्ह होत नाहीं. बाकी त्यास दमा आहे, तो गरीब आहे, त्याचा माझा द्वेष आहे वगैरे कारणाकरिता जर स्री पुरुषाचा त्याग करील तर तें साहस समजून त्यास स्मृतिग्रंथातून राजदंड सागितला आहे. हा दंड काय आहे त्याचा आपण आता विचार करूं, स्रीपुंव्यवहार पतीचा त्याग करणाया स्रीस जर राजदंड आहे तर नवराबायकीचा खटला राजाकडे अवश्य गेला पाहिजे. नवराबायकोची एकमेकावर फिर्याद होत नाहीं म्हणून जे रा. ब. म्हणतात तें अगदीं सामान्य वाक्य आहे. म्हणजे होईल तेवढे करून राजानें असल्या फिर्यादी आपापसांत मिटविण्यास सागाच्या एवढाच त्याचा अर्थ आहे. रा. ब. नीं हीही गोष्ट जुलमानें कबूल केल्यासारखी आहे; पण आम्ही त्यांस असे सांगतों कीं, येथे असल्या ओढाताणीची काहीं गरज नाहीं. आमच्या शास्त्रकारानीं या गोष्टीचा निकाल केला आहे. विज्ञानेश्वरानीं या विषयावर खाली दिल्याप्रमाणे आपला सिद्धात दिला आहे:-- यतुस्मरणं -‘‘ गुरोः शिष्ये पितुः पुत्रे देपत्येोः स्वामिभृत्ययो: । विरोधेऽपि मिथस्तेषां व्यवहारो न सिध्यति । ?’ इति तदपि गुरूशिष्यादिनामात्यंतिक व्यवहार प्रतिषेधपरं न भवति । तेषामपि कथंचिद्व्यवहारस्यष्टत्वात् तथाहि शिष्धादिशिष्टिरवधे नाशक्तैौं रज्जुवणुविदलाभ्या तनुभ्यामन्येन घ्नन् राज्ञा शास्य इति गौतमस्मरणात् यदि गुरु: कोपावेशवशात् उत्तमागे ताडयति यदा स्मृतिव्यपेतेन मार्गणाधर्षितः शिष्येो राज्ञे निवेदयति तदा भवत्येव व्यवह्ारपदं ।. ... . .तथा दुर्भिक्षं धर्मकार्ये च व्याधौ संप्रतिरोधके गृहीतं स्त्रीधन भर्ता नाकामेो दातुमर्हतीति स्मरणात् दुर्भिक्षादि व्यतिरेकेण यदि स्त्रीधनं भर्ता व्ययीकृत्य विद्यमान धनोऽपि याच्यमानो न ददाति तदा दंपत्योरपि इष्यतॆ एवंविवादः ।...तस्मात् दृष्टादृष्टयोः श्रयस्करो न भवति गुर्वादिभिर्व्यवह्ार इति प्रथमं शिष्यादयेो निवारणीयाः राज्ञा ससभ्येनेति ** गुरोः शिष्थ ?’ इत्यादे: श्लोकस्य तात्पर्थोर्थः । अत्यंतनिर्बन्धे तु शिष्यादिनामपि उक्तरीत्या प्रवर्तनेीयो व्यवह्ार: । म्हणजे इंग्लंडात हल्ली ज्याप्रमाणें नवराबायकी मिळून कायद्यात एक व्यक्ति मानतात तरी नव-यानें बायकास मारिल्यास तिची त्यावर फिर्याद चालते; तशीच जरी ** या भर्ता सा स्मृतांगना' अशी स्मृति आहे तरी तिचा अर्थ इतकाच ध्यावयाचा कीं साधारणरीत्या राजाने हे खटले आपल्यापुढे येऊं देऊं नयेत. बाकी नवरा बायकोस मारील किंवा तिचे स्रीधन घेईल तर व्यवहार म्हणजे फिर्याद होण्यास कांहीं हरकत नाहीं. असें जर नसेल तरः-- स्रीबालोन्मत्तवृद्धानां दरिद्राणा च रोगिणा शिफाविदलरज्ज्वाद्यैः विदध्यान्नृपतिर्दमं ।