रावबहादुर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य. ५९ शास्रांत शिक्षा नाहीं असा रा. ब. चा अभि पाय आहे. यावर प्रथमत: रा. ब. स आमचा असा प्रश्न आहे कीं, ** अधिवेदन ” या शब्दाचा अर्थ त्यानीं टीकेत किंवा कोशांत काढून पाहिला होता काय ? ती पाहिला असतां तर रा. ब. स आपली चूक तेव्हाच कळून आली असती. पण पूर्वाग्रहामुळे आपण अज्ञात भूमीवर संचार करीत आहाँ हें रा. ब. च्या लक्षात आले नाहीं; व त्यामुळेच त्यांनी ही अंधारात उडी घेतली असावी ! एव्हवीं संस्कृताचे यत्किचित्ही ज्यास ज्ञान आहे किंवा निदान आपणांस फारसें संस्कृत येत नाहीं असें तरी ज्यास पूर्ण ठाऊक आहे त्याच्या हातून असला प्रमाद कधीही झाला नसता ! अधिवेदन शब्दाचा वास्तविक अर्थ ** एक बायको जिवंत असतां दुसरा विवाह करणें ’ असा आहे. वेदन हा शब्द (विद्) लग्न करणे या धातूपासून आला असून अधि (अधिक) वेदन म्हणजे एक स्री असता दुसरे लग्न करणें होय. विज्ञानेश्वरांनीं ** अधिवेदनं भार्यान्तरपरिग्रहः ’ अशी स्पष्ट व्याख्या केली आहे. आधिवेदनाचा हा अधिकार पुरुषासच आहे, स्रियांस नाहीं; व पुरुषांसही कांहीं नियमित कारणाकरिताच तो अधिकार दिला आहे मनूनें म्हटले आहे: मद्यपाऽसाधुवृत्ता च प्रतिकूला च या भवेत् व्याधिता वाधिवेत्तव्या हिंस्राऽर्थध्नी च सर्वदा । वंध्याष्टमेधिवेद्याब्दे दशमे तु मृतप्रजा एकादशे स्त्रीजननी सद्मस्त्वाप्रेयवादिनी । या रोगिणी स्यातु हिता सपन्ना चैव शीलतः सानुज्ञाप्याधिवत्तव्या नावमान्या च कहिँचित् । म्हणजे जर पहिली बायको दारुबाज, वाईट चालीची, द्वाड, रोगी किंवा उधळी असेल तर पुरुषानें दुसरा विवाह करावा. वाझ असल्यास आठ वर्षानीं, मुले वाचत नसल्यास दहा वर्षीनीं, मुलीच होत असल्यास अकरा वर्षीनी व अप्रिय बोलणारी असल्यास लागलीच पुरुषानें दुसरा विवाह करावा रोगी असून अनुकूल व सुशील असल्यास तिच्या परवानगीने विवाह करावा व तिचा कधी अवमान करू नये. याज्ञवल्क्यानीही असेंच सागितले आहे: सुरापी व्याधिता धूर्ता वध्यार्थध्न्यप्रियंवदा स्त्रीप्रसूश्वाधिवेत्तव्या पुरुषद्वेषिणी तथा । यावरून उघड होतें कीं ज्याअर्थी पुत्रोत्पादन व धर्मार्थकामाची वृद्धि हा लग्न करण्याचा मुख्य हेतु शास्त्रांत मानिला आहे त्या अर्थी पहिल्या बायकोस पुत्र होण्याचा किंवा तिच्यापासून संसारात नवयास सुख होण्याचा जेव्हा संभव नसतो तेव्हां शास्त्रानें त्यास दुसरें लग्न करण्याची मोकळीक दिली आहे. तथापि पहिल्या बायकेोस (ती अनुकूल असल्यास मनूप्रमाणे चांगलें, नसल्यास निदान पोटापुरतें तरी) अन्नवस्र त्यास दिलेच पाहिजे.
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/74
Appearance