Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

년 लो० टिळकांचे केसरींतील लेख जावें. स्वैच्छ व्यभिचारास वरील मनुवचनाप्रमाणे पूर्ण प्रायाश्चत आहे. ” व्यभिचारप्रकरणीं अनुलेोम व प्रतिलेोम म्हणजे उत्तम जातीच्या वणीनीं खालच्याजातोशीं आणि खालच्या जातींनीं वरच्याशीं व्यभिचार केल्यास निरनिराळा दंड सांगितला आहे हें वाचकास येथे सांगितले पाहिजे. कत्यायन स्मृतीत पुरुषांच्या निम्म स्त्रियांस दंड असें जें सांगितले आहे त्याची व्यवस्था मनुवचनाशीं एकवाक्यता करण्याकरितां नेहमींच्या सरणीप्रमाणें कुल्लूक काय करितात हेंही वर निर्दिष्ट केलेंच आहे. आता मनूनें व्यभिचारास राजदंड काय सांगितला आहे तो पहा. सध्या सजातीय व्यभिचाराचाच विचार करूं शतानि पंच दंड्यः स्यात् इच्छन्त्या सह् संगमे । असा व्यवहारप्रकरणीं मनूनें स्रीच्या इच्छेने व्यभिचार करणाच्या पुरुषास दंड सांगितला आहे. साधारणपणें “ यत्पुंस:परदारेषु ” इ० वचनावरून स्त्रीसही हाच दंड आहे. पण जर द्रव्य, रूप, इत्यादिकांच्या जोरावर नवन्यास तुच्छ मानून एखादी स्री व्यभिचार करील तर मनूत तीस: भर्तोरं लंघयेद्यातु स्त्री ज्ञातिगुणदर्पिता तां श्वभिः खादयेद्राजा संस्थाने बहुसंस्थिते । राजानें कुत्र्याकडून खाववावें अशी कडक शिक्षा सागितली आहे. रा० ब. म्हणतात कीं, हें वचन मूळ यमस्मृतीतील असून ब्राह्मणस्री शूद्राशीं व्यभिचार करील तर तीस ही शिक्षा आहे. रा० ब० यमस्मृति पूर्वीची समजतात की काय कोण जाणे ? यमस्मृतीतील वचन असे आहे: वृषलं सेवते या तु ब्राह्मणी यदमोहिता ता श्वाभ खादयेद्राजा संस्थाने वध्यघातिना । पण या वचनाने मनुस्मृतीतील वचनाचा कसा बोध होतों हें आम्हास समजत नाहीं. ग्रंथ लावण्याची जी सरणी आम्ही पूर्वी दिली आहे त्यावरून मनुस्मृति स्पष्टार्थ असता तिचा यमस्मृतीनें बोध होत नाहीं. करितां मनुस्मृतीतील व यमस्मृतीतील शिक्षा निरनिराळ्याच मानिल्या पाहिजेत. मनूवरील सर्व टीकाकारांस हाच पक्ष संमत आहे. म्हणजे ते मनुस्मृतींतील वचन सामान्यतः स्री गर्वानें शिरजोर होऊन व्यभिचार करील तर तीस लागते असे म्हणतात. यमस्मृतींतील वचन विशिष्ट आहे, व शिवाय त्यांत ज्ञाति-धन-दपांचा उल्लेख नाहीं. हा दोहोंतील भेद आहे. रा. ब. जो अर्थवाद करूं पाहातात त्यांतही कांहीं हंशील नाहीं; कारण तसा अर्थवाद एकतर कोणत्याही टीकाकारानें केला नाहीं आणि दुसरें रा. ब. असा अथेवाद करण्यास जी कारणें देतात तीं सर्व भ्रातिमूलक आहेत असे वर दाखविलेंच आहे. साराश, मनूनें व्यभिचारास धर्मदंड, लोकदंड व राजदंड