છે દ્ર लो० टिळकांचे केसरींतील लेख प्रश्न आहे यासंबंधानें बाकीच्या गोष्टींचा विचार मागे वेळोवेळीं आम्हीं केलाच आहे, व पुढेही जरूर पडल्यास केला जाईल. प्रमाणग्रंथ व त्यांची सरणी रा. ब. नीं धर्मशास्रावरील प्रमाणग्रंथ आपणास कोणते मान्य आहेत हें सागितलेंच आहे. मनु, याज्ञवल्क्य ( स्मृतिकार), कुल्लूक, विज्ञानेश्वर ( टीकाकार) आणि नीलकंठादि (निबंधकार ) हे त्यास प्रमाण आहेत. तेव्हा त्याबद्दल मुळीच वाद नाहीं. वेद सर्व धर्मग्रंथाचे मूल, परंतु प्रस्तुत प्रकरणाचे त्यात विवेचन नसल्यामुळे ते येथे सोडून देण्यास कांही हरकत नाहीं. बाकी शिल्लक राहिला देशाचार म्हणजे देशरिवाज. हाही स्मृतिग्रथातून प्रमाण धरिला आहे. पण रा. ब. च्या पक्षास ही गोष्ट अनुकूल नाही म्हणून ते असे प्रतिपादन करितात की-- यस्मिन् देशे य आचारो व्यवह्ारकुलस्थितिः तथैव परिपाल्योऽसौ यदा वशमुपागतः । असें जें राजानं आचार पाळावा म्हणून वचन आहे तें जिकलेल्या राष्ट्राबद्दल आहे स्वराष्ट्रात आचार जर शास्रविरुद्ध नसल तरच प्रमाण मानावा. उदा हरणार्थ, प्रस्तुत प्रकरणीं नेटिव्ह संस्थानांतून जेो आचार आहे तो शास्रावरुद्ध नसल्यास प्रमाण समजावा, पण हा रा. ब. चा कोटिक्रम व्यर्थ आहे. कारण जरी वरील वचन जिकलेल्या राष्ट्राबद्दल आहे तरी स्वराष्ट्रातील आचार (मग ते शास्रशुद्ध असेो वा विरुद्ध असो ) ह्याचप्रमाणें मान्य करावा अशाबद्दल स्मृति ग्रंथातून दुसरीं पुष्कळ वचन आहेत. वेदः स्मृतिः सदाचारेी स्वस्य न प्रियमात्मनः । अशी जी चार धर्मीचीं मृळे मनूत सागितली आहेत त्यात “ सदाचार ’ आहे. सदाचाराची व्याख्या चतुर्विशति मताप्रमाणे-- यस्मिन् देशे य आचारः पारंपर्यक्रमागतः वणीना किल सर्वेषां स सदाचार उच्यते । अशी आहे, म्हणजे ज्या देशात जो आचार पूर्वापार चालत आला आहे त सदाचार म्हणावा. हा शास्त्रविरुद्ध असला तरी प्रमाण आहे. यद्यदाचर्यते येन धम्र्य वाऽधम्र्यमेव वा। देशस्याचरणे नित्ये चरित्रं तद्धिकीर्तितम् । अतएव देशाचार धम्र्य असो वा अधम्र्य असो, तो अवश्य पाळला पाहिजे, वस्तुतः प्रथम आचार व मागून ग्रंथ ** आचारसंभवेो धर्मः ” असॆ वचन आाहे, म्हणून स्मृतीचा व आचाराचा विरोध आल्यास आचारच प्रधान मानावा.
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/61
Appearance